Urfi Javed | अखेर उर्फी जावेद हिने चाहत्यांची ही इच्छा केली पूर्ण, व्हिडीओ…
इतकेच नाहीतर माझा नंगा नाच सुरूच राहणार असल्याचे उर्फीने सांगून टाकले आहे.
मुंबई : उर्फी जावेद हिच्याविरोधात थेट भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीये. इतकेच नाहीतर उर्फीच्या कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी एकप्रकारे मोर्चा सुरू केलाय. कुठलाही विचार न करता उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले. इतकेच नाहीतर माझा नंगा नाच सुरूच राहणार असल्याचे उर्फीने सांगून टाकले आहे. या वादामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही उडी घेतली. मग काय चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरच टीका केलीये.
चित्रा वाघ यांनी जरी उर्फी जावेद हिच्याविरोधात तक्रार दाखल केली, तरीही उर्फीला काहीच फरक पडला नसल्याचे दिसत आहे. कारण उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्या नाकावर टिच्चून हटके कपडे घालताना दिसत आहे.
View this post on Instagram
चित्रा वाघ यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर उर्फी हिने थेट भगव्या रंगाची बिकिनीच घातली होती. नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. विशेष म्हणजे काळ्या बिकिनीमध्ये बोल्ड पोज देत उर्फी डान्स करताना दिसत आहे. उर्फीने हा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांची इच्छा पूर्ण केलीये.
उर्फीच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देताना दिसत आहे. उर्फीचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. विशेष म्हणजे उर्फीच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ आवडला देखील आहे.