दोन महिन्यानंतर लग्न होणार होतं, त्या आधीच टोकाचं पाऊल उचललं; वैशालीने आत्महत्येपूर्वी मित्रांना काय सांगितलं?
आधी तिच्या आत्महत्येची बातमी मला खोटी वाटली. माझा त्यावर विश्वासच बसला नाही. मी जान्हवीला तिला फोन करायला सांगितला. पण फोन घेतला गेला नाही.
Vaishali Takkar Sucide Case : अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Takkar) हिने मध्यप्रदेशातील इंदौर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळे (Sucide Case) एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ती नॉर्मल होती. ती येत्या दोन महिन्यात लग्नही करणार होती, असं सांगण्यात येतं. मात्र, त्यानंतरही तिने आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अभिनेते विकास सेठी आणि त्यांची पत्नी जान्हवी राणा हे वैशालीच्या अत्यंत जवळचे होते. वैशालीच्या आत्महत्येपूर्वी म्हणजे एक दिवस आधी त्यांनी वैशालीशी फोनवरून चर्चा केली होती. आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी मुंबईला येण्याचा प्लॅन तिने यांना सांगितला होता. कॅलिफोर्निया येथे राहत असलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरशी ती डिसेंबरमध्ये विवाह करणार होती.
वैशालीच्या मृत्यूवर जान्हवीने दु:ख व्यक्त केलं आहे. मी एक दिवसापूर्वी आर्थिक मदतीसाठी वैशालीला फोन केला होता. दिवाळीनंतर लग्नाच्या खरेदीसाठी मुंबईला येणार असल्याचं तिने मला सांगितलं होतं. वैशालीने मितेशबाबत मला पाच महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर मी तिच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवादही साधला होता. ती फोर गोड वाटत होती, असं जान्हवी म्हणाली.
वैशाली डिसेंबरमध्ये लग्न करणार होती. दोन्ही कुटुंब लग्नाची तारीख फिक्स करणार होते. मी तिच्याशी शुक्रवारीच फोन करून संवाद साधला. यावेळी एकदम चांगलं चालल्याचं ती म्हणाली. आमच्यासोबत शॉपिंग आणि पार्टी करणार असल्याचं ती म्हणाली होती. मात्र, तिच्या आत्महत्येची बातमी ऐकून आम्ही हादरून गेलो आहोत, असं वैशाली म्हणाली.
आधी तिच्या आत्महत्येची बातमी मला खोटी वाटली. माझा त्यावर विश्वासच बसला नाही. मी जान्हवीला तिला फोन करायला सांगितला. पण फोन घेतला गेला नाही. आम्ही वैशालीच्या वडिलांना फोन केला. त्यावेळी तिने आत्महत्या केल्याचं आम्हाला त्यांच्याकडून कळलं, असंही विकास यांनी सांगितलं.