Tujhech Mi Geet Gaat Aahe: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत वनिता खरातची एण्ट्री

रंजनाचा स्वभाव थोडासा रागीष्ट आहे मात्र स्वराची पार्श्वभूमी कळल्यावर ती खूप प्रेमाने तिला जवळ करते. मालिकेत हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत वनिताची खास गट्टी जमली आहे.

Tujhech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत वनिता खरातची एण्ट्री
Vanita KharatImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 8:25 AM

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता असतानाच आता मालिकेत रंजना या नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) रंजना हे पात्र साकारत असून मालिकेत तिचं स्वरासोबतचं खास सीन पाहायला मिळणार आहेत. रंजना हे पात्र खूपच वेगळं आहे. रंजना एक छोटीशी खानावळ चालवत असते. वडिलांचा शोध घेत असलेल्या स्वरासोबत तिची भेट होते आणि काही काळासाठी ती तिला आपल्या खानावळीत आसरा देते. खास बात म्हणजे रंजना हे पात्र मालवणी भाषेत बोलतं. अभिनेत्री वनिता खरातसाठी मालवणी भाषेत बोलणं आव्हानात्मक होतं. मात्र सहकलाकारांच्या मदतीने मालवणी भाषेचा गोडवा जपत तिने हे पात्र खुलवलं आहे.

रंजनाचा स्वभाव थोडासा रागीष्ट आहे मात्र स्वराची पार्श्वभूमी कळल्यावर ती खूप प्रेमाने तिला जवळ करते. मालिकेत हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पडद्यामागेही स्वराची भूमिका साकाराणाऱ्या अवनीसोबत वनिताची खास गट्टी जमली आहे. इतक्या लहान वयात तिला असणारी समज पाहून थक्क व्हायला होतं. स्वरा साकारण्यासाठी अवनीने नागपूरी भाषा आत्मसात केली आहे. अतिशय गोड आणि हुशार अश्या स्वरासोबत काम करताना अतिशय मजा आली अशी भावना वनिताने व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्वरा आणि तिच्या बाबांची भेट-

बाबांची लवकरात लवकर भेट व्हावी अशी स्वराची इच्छा असतानाच योगायोगाने साईबाबांच्या मंदिरात स्वरा आणि तिचे बाबा एकत्र येतात. मंदिरात दोघं एकत्र येतात खरे पण बाप-लेकीची भेट होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. ठाणे वर्तक नगर येथील प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिरात बाप-लेकीसोबतचा हा खास सीन शूट करण्यात आला आहे. या सीनसाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून जास्तीत जास्त रिअल लोकेशनचा वापर करण्यात येत आहे. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.