अंकिता लोखंडे हिची ‘बिग बाॅस 17’च्या निर्मात्यांनी केली भांडाफोड, थेट हे गंभीर आरोप, अभिनेत्रीची अखेर पोलखोल
बिग बाॅस 17 च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. मात्र, म्हणावा तसा गेम खेळण्यात अजूनही अंकिता लोखंडे हिला यश मिळाले नाही. आता तर अंकिता लोखंडे हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
मुंबई : बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. मात्र, बिग बाॅस 17 च्या घरात मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना काही सुविधा दिल्या जातात. डाॅक्टर बिग बाॅस 17 च्या घरात येऊन त्यांचे चेकअप करतात. ते डाॅक्टर हे बिग बाॅस 17 कडून येत नाहीत ते अंकिता आणि विकी यांचे पर्सनल डाॅक्टर आहेत.
नुकताच बिग बाॅस 17 च्या निर्मात्यांनी मुनव्वर फारुकी याला एक ओडिओ क्लिप ऐकवली. त्यामध्ये अंकिता लोखंडे ही तिच्या डाॅक्टरांना बाहेरील माहिती विचारताना दिसलीये. जे बिग बाॅस 17 मध्ये अत्यंत गंभीर आहे. बाहेरची माहिती मागताना अंकिता लोखंडे ही दिसली आहे. इतकेच नाही तर घराचा नवा कॅप्टन मुनव्वर असल्याने हे चुकीचे की बरोबर हे बिग बाॅस 17 ने मुनव्वर याला विचारले.
यावर मुनव्वर फारुकी याने स्पष्टपणे सांगितले की, हे चुकीचे आहे. यानंतर मुनव्वर फारुकी याला बिग बाॅस सांगतात की, घरातील सर्व सदस्यांना एकत्र कर आणि जे घडले ते सांग. यानंतर मुनव्वर फारुकी हा घरातील सदस्यांना एकत्र करतो आणि जे घडले ते सांगताना दिसतो. मात्र, अंकिता लोखंडे ही आपली चूक मान्य करताना दिसत नाहीये.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे ही म्हणाली की, मी कधीच बाहेरच्या गोष्टींबद्दल डाॅक्टरांसोबत चर्चा केली नाहीये. मात्र, मुनव्वर फारुकी हा म्हणतो की, मी स्वत: याबद्दलची क्लिप ऐकली आहे. बिग बाॅसने मला ती ऐकवी आहे. मुनव्वर फारुकी याचे हे बोलणे ऐकून घरातील सदस्य हे हैराण झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, अंकिता लोखंडे मी असे कधीच केले नसल्याचे म्हणताना दिसलीये.
यासर्व प्रकरणानंतर अंकिता लोखंडे ही ढसाढसा रडताना दिसली आहे. इतकेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी मिळून निर्णय घेतला की, अंकिता लोखंडे हिला मिळणाऱ्या या सुविधा बंद केल्या जाव्यात. आता हाच प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले असून सर्वजण अंकिता लोखंडे हिच्यावर टीका करत आहेत.