मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे सोशल मीडियावर उर्फी जावेद हिची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो (Photo) शेअर करते. उर्फी कधी काय कपडे घालेल याचा अजिबात नेम नाहीये. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिच्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला मोर्चा हा उर्फी जावेद हिच्याकडे वळवला होता. इतकेच नाही तर चित्रा वाघ यांनी थेट पोलिस ठाण्यात उर्फी जावेद हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये उर्फी जावेद दिसली होती. चित्रा वाघ यांनी जिथे दिसेल तिथे उर्फीला थोपटून काढण्याची भाषा देखील केली होती. उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले होते. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या उर्फी जावेद हिच्यासाठी मैदानात उतरल्या होत्या.
उर्फी जावेद सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. उर्फी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. इतकेच नाही तर काही व्हिडीओ आणि फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी कायमच शेअर करते.
नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओमध्ये तिच्या टीममधील लोक दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्फी जावेद ही एका मुलीच्या तोंडावर रागामध्ये पाणी फेकत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.
व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे की, उर्फी जावेद फक्त आणि फक्त मजाक करत आहे. त्या मुलीच्या तोंडावर पाणी फेकल्यानंतर उर्फी जोरात हसताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
उर्फी जावेद हिने जरी मजाकमध्ये मुलीच्या तोंडावर पाणी फेकले असेल तरीही अनेकांना हा व्हिडीओ अजिबात आवडला नाहीये. व्हिडीओ बघितल्यावर अनेकांनी उर्फीला सुनावण्यास सुरूवात केलीये.
काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने शर्ट न घालता व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिच्या हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट दिसत होती. उर्फी जावेद हिचा तो व्हिडीओ बघितल्यावर अनेकजण हैराण झाले होते.