TV: येत्या रविवारी पहा आपल्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये नेहा आणि अविनाश येणार आमनेसामने, तर 'मन उडु उडु झालं'मध्ये रंगणार इंद्रा आणि दिपूचा विवाहसोहळा

TV: येत्या रविवारी पहा आपल्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग
येत्या रविवारी पहा आपल्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भागImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 8:25 AM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी तत्पर असते आणि त्यांच्या मनोरंजनात कुठेही खंड पडू देत नाही. त्यामुळे येत्या रविवारीदेखील प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग पाहायला मिळणार आहे. मन उडु उडु झालं (Man Udu Udu Zhala) या मालिकेत सध्या इंद्रा आणि दिपूच्या लग्नाची लगबग दिसतेय. या दोघांच्या लग्नाचा थाट प्रेक्षकांना येत्या रविवारी संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळेल. तर माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेत काही दिवसांपूर्वीच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच अविनाशची एंट्री झाली आहे. अनेकदा नेहा आणि अविनाश एकमेकांसमोर येता येता राहिले आहेत. मालिकेत येणाऱ्या भागात नेहाचा वाढदिवस साजरा होणार आहे.

नेहाला वाढदिवसाचं मोठ आणि धक्कादायक गिफ्ट मिळणार आहे. कारण परीचा ड्रायव्हर काकाच अविनाश असल्याचं सत्य अखेर नेहासमोर येणार आहे. अविनाशला पाहून नेहाची प्रतिक्रिया काय असेल? अविनाशच पॅलेस मध्ये येण्यामागचं कारण उघडकीस येणार का? हे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या रविवारच्या भागात पहायला मिळेल. रात्री 8 वाजता हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय जयवंत वाडकर आणि त्यांच्या सौ यांच्यासोबत बँड बाजा वरात सेलिब्रिटींचं लग्न जोरात या कार्यक्रमाचा धमाल एपिसोड रंगणार आहे. हा विशेष भाग रविवारी रात्री 9 वाजता प्रसारित होईल.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

मन उडु उडू झालं मालिकेच्या टीमने नुकतंच शेवटच्या शेड्युलचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर रॅप अप पार्टी करण्यात आली. या मालिकेचा क्लायमॅक्स एपिसोड लवकरच झी मराठीवर प्रसारित होईल. अजिंक्यने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मालिकेच्या क्लायमॅक्स एपिसोडमध्ये प्रेक्षकांना इंद्रा आणि दीपूचं लग्न पहायला मिळणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.