kaun banega crorepati : 8 वर्षीय ‘Google Boy’ ला 1 कोटीसाठी अमिताभ बच्चन यांनी कोणता प्रश्न विचारला?

kaun banega crorepati : बिग बी अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोड़पति' या शोमध्ये 8 वर्षीय 'Google Boy' विराट अय्यर आला. तो एक कोटी जिंकण्याचा अंतिम टप्प्यात होता. परंतु शेवटच्या प्रश्नात तो गोंधळला. खूप वेळ विचार केल्यावर त्याने चुकीचे उत्तर दिले. अन्यथा आठ वर्षीय विराट करोडपती झाला असता.

kaun banega crorepati : 8 वर्षीय 'Google Boy' ला 1 कोटीसाठी अमिताभ बच्चन यांनी कोणता प्रश्न विचारला?
amitabh bachchan virat ayyarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 5:29 PM

रायपूर, दि. 23 नोव्हेंबर | बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोड़पति’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. परंतु यावेळी हा शो वेगळच ठरला. कारण अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सिटवर होता गुगुल बॉय. छत्तीसगडमधील भिलाई येथील विराट अय्यर हा गुगुल बॉय म्हणून ओळखला जातो. त्याचे वय फक्त आठ वर्ष आहे. आठ वर्षीय या विराटने विराट कोहलीसारखी विराट कामगिरी केली. पण शेवटच्या क्षणात तो कोंडीत पकडला गेला. एक कोटीच्या प्रश्नापर्यंत तो पोहचला. एकानंतर एक प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले. यामुळे एक कोटी जिंकण्याचा तो अंतिम टप्प्यात होता. परंतु त्याला एक कोटीसाठी खूप कठीण प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्याला विचारले. ‘क्या आप क्विट करना चाहेंगे’. त्यावर विराट याने म्हटले- ‘नहीं सर, थोड़ा सोचूंगा.’ पण विराट एक कोटी जिंकू शकला नाही.

काय होता एक कोटीचा प्रश्न

अमिताभ बच्चन याने एक कोटीसाठी रसायनशास्त्रातील प्रश्न विचारला. अमिताभ बच्चन यांनी विचारले की ‘पीरियॉडिक टेबल में 96 और 109 परमाणु संख्या वाले दो तत्वों के नाम के बारे में क्या बात विशेष है?’ त्याला खालील पर्याय दिले होते.

हे सुद्धा वाचा
  • A नोबेल विजेताओं के नाम पर हैं
  • B महिला वैज्ञानिकों के नाम पर हैं
  • C भारतीय वैज्ञानिकों के नाम पर हैं
  • D उनके कोई नाम नहीं हैं

अभिताभ बच्चन विराटचे फॅन

विराट या प्रश्नावर अडचणीत आला. तो A किंवा B च्या संभ्रमात होता. खूप वेळ विचार केल्यावर त्याने A उत्तर लॉक केले. परंतु हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नांचे बरोबर उत्तर B होते. यामुळे विराटला एक कोटी ऐवजी 3 लाख 20 हजार रुपये मिळाले. या शोचे प्रसारण २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी झाले. परंतु या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन त्या मुलाचे फॅन झाले. विराट फक्त तिसरी आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.