जेव्हा विनोदाच्या बादशहासमोर अभिनयाचे बादशहा आदराने झुकतात! समीर चौघुले आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ फोटोची चर्चा!
नुकतंच हास्यजत्रेच्या विनोदवीरांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी चक्क बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘विनोदाचा बादशहा’ समीर चौघुले यांच्यासमोर आदराने झुकतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरचा ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कथाबाह्य कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकतंच हास्यजत्रेच्या विनोदवीरांनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी चक्क बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ‘विनोदाचा बादशहा’ समीर चौघुले यांच्यासमोर आदराने झुकतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या फोटोत चक्क अमिताभ बच्चन हे अभिनेता समीर चौघुले यांच्या पाया पडताना दिसत आहेत. संपूर्ण मनोरंजन विश्वात हा फोटो एक सुवर्णक्षण असल्याचे म्हटले जात आहे. नुकतीच या कार्यक्रमाच्या टीमने अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सर्व कलाकाराचे खूप कौतुक केल. तर, समीर चौघुले यांच्या अभिनयाला त्यांनी विशेष दाद दिली. यावेळी आपण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम नियमित पाहत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.
प्रसाद ओकने शेअर केले फोटो :
View this post on Instagram
अभिनेता प्रसाद ओकनं देखील सोशल मीडियावर या सुंदर क्षणाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत संपूर्ण टीम महानायक अमिताभ बच्चन यांच्यासी संवाद साधताना दिसत आहे.
प्रसाद ओक यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘काही काही मित्र आयुष्यात स्वप्नपूर्ती साठीच आलेले असतात…तसाच एक जवळचा मित्र म्हणजे “अमित फाळके”. ज्यांनी 2009 साली माझं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न पूर्ण केलं… मला “हाय काय नाय काय” करता आला तो अमित मुळेच. आणि आता आयुष्यातलं अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते ही त्याच्यामुळेच. ज्याला मी देव मानत आलोय त्याचं दर्शन झालं… प्रत्यक्ष “बच्चन” साहेबांचं…’
प्रसाद पुढे लिहितात, ‘#महाराष्टाचीहास्यजत्रा हा कार्यक्रम बच्चन साहेब नियमित पाहतात आणि त्यामुळे आमच्या पूर्ण टीम चं कौतुक करण्यासाठी त्यांनीच ही संधी आम्हाला दिली. हास्यजत्रेच्या टीम चा भाग असल्याचा आज प्रचंड अभिमान वाटतोय. मनःपूर्वक आभार “सोनी मराठी” चे आणि खूप खूप खूप प्रेम “अमित फाळके”…!!!’
हे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हास्यजत्रेच्या कलाकारांना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत बघून चाहतेसुद्धा प्रचंड आनंदीत आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सर्व विनोदवीरांचं कौतुकही केलं आहे.
‘हास्य’ थेरपी
कोव्हिड सेंटरमध्ये बऱ्याचदा चिंतेचं आणि नैराश्याचं वातावरण असतं. आजार, चिंता आणि एकंदरीत भीतीमुळे रुग्ण हसणं विसरून जातात. अशा रुग्णांना मनोरंजनाचे क्षण मिळावेत आणि त्यांनी दिलखुलास हसावं यासाठी सोनी मराठी वहिनीचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील कोव्हिड सेंटर्समध्ये सोनी मराठी वाहिनीने टीव्ही उपलब्ध करून दिले होते. क्वारंटाईनच्या काळात हास्यजत्रा पाहून अनेकांना दिलासा मिळाला आणि त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुधारलं, अशा आशयाचे मेसेज आणि इमेल्स टीमला कौतुकरुपी मिळाले होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नुकतेच या कार्यक्रमातील कलाकारांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोरोना काळात रसिकांना हास्यथेरपी देण्याची काम हास्यजत्रेच्या कुटुंबाने प्रामाणिकपणे केले. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील “माझा पुरस्कार” हास्य जत्रा मालिकेतील कलाकारांना माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी देण्यात आला. प्रतिष्ठेचा हा पुरस्कार कलेची जाण असलेल्या व्यक्तीकडून स्वीकारावा यापेक्षा अजून काय हवं?, अशी प्रतिक्रिया यावेळी कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :
Khatron Ke Khiladi 11 : दिव्यांका त्रिपाठीला मागे टाकत अर्जुन बिजलानीने जिंकली KKK11ची ट्रॉफी
VIDEO | Trailer Out : चिरंजीवी यांनी रिलीज केला साई धरम तेजच्या ‘रिपब्लिक’ चित्रपटाचा ट्रेलर