‘नट्टू काका’ गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये परतणार? ‘तारक मेहता..’मध्ये घनश्याम नायक यांच्या जागी नव्या अभिनेत्याची चर्चा!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) या भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक असलेल्या मालिकेच्या टीमला काही दिवसांपूर्वी मोठा झटका बसला आहे. या टीव्ही मालिकेतील महत्त्वाचा भाग असलेले नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांनी या जगाचा निरोप घेतला.

‘नट्टू काका’ गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये परतणार? ‘तारक मेहता..’मध्ये घनश्याम नायक यांच्या जागी नव्या अभिनेत्याची चर्चा!
Ghanashyam Nayak
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:13 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka ooltah chashmah) या भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही मालिकांपैकी एक असलेल्या मालिकेच्या टीमला काही दिवसांपूर्वी मोठा झटका बसला आहे. या टीव्ही मालिकेतील महत्त्वाचा भाग असलेले नट्टू काका म्हणजेच अभिनेते घनश्याम नायक यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर शोमध्ये त्यांच्या व्यक्तिरेखेऐवजी कोणाला घ्यायचे यावर चर्चा सुरू झाली आहे. आता अभिनेता निवडल्याच्या बातम्या येत असल्याने, नव्या नट्टू काकांचा शोध संपल्याचे दिसत आहे.

अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, नट्टू काकांच्या भूमिकेसाठी एक अभिनेता सापडला आहे आणि तो लवकरच या शोशी देखील जोडला जाईल. @Jehtho नावाच्या एका चाहत्याने इंस्टाग्रामवर एका ज्येष्ठ अभिनेत्याचा फोटो शेअर केला आहे आणि “तुम्हाला काय वाटते?” असे कॅप्शन लिहिले आहे.

पाहा पोस्ट :

फोटोत दिसणारी म्हातारी व्यक्ती नट्टू काका ज्या स्टाईलने बसायचे त्याच स्टाईलमध्ये बसलेली दिसत आहे. अभिनेता खुर्चीवर बसला आहे आणि गडा इलेक्ट्रॉनिक सारखे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. या फोटोसोबत घनश्याम नायक यांचा फोटो डाव्या बाजूला लावल्याने त्यांच्या जागी हा अभिनेता दिसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खुर्चीवर बसलेली व्यक्ती जेठालालच्या दुकानात बसली आहे असे लोक मानत असल्याने हा फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या महिन्यात झाले अभिनेत्याचे निधन

‘नट्टू काका’ फेम अभिनेते घनश्याम नायक यांचे 3 ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. ‘तारक मेहता’च्या संपूर्ण टीमने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये ‘जेठालाल’ आणि ‘नट्टू काका’ यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. त्यांच्यामधील तू तू मैं मैं आणि जुगलबंदी या दोन्ही गोष्टी प्रेक्षक खूप मिस करत आहेत. अशी अपेक्षा आहे की, शोचे निर्माते लवकरच या पात्राच्या बदलीबद्दल अधिकृत घोषणा करतील.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सब टीव्हीवर प्रसारित केला जातो. हा शो टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. समाजात राहणाऱ्या काही कुटुंबांची कथा यात दाखवण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने सामान्य माणूस स्वतःला सामान्य माणसाशी जोडू शकतो.

हेही वाचा :

शाहरुखच्या लेकीची दिवाळी न्यूयॉर्कमध्येच! भाऊ आर्यनला भेटण्याऐवजी मैत्रिणींसोबत धमाल करतेय सुहाना खान

Sooryavanshi box office collection Day 3 : ‘सूर्यवंशी’ची दिवाळी जोशात, अवघ्या 3 दिवसांत तब्बल 75 कोटींची कमाई!

Bigg Boss Marathi Season 3 Elimination | ‘ताईगिरी’ संपली, तृप्ती देसाई ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाहेर, मांजरेकरही हळहळले

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.