‘काही खरं नाही हिचं’; ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीसाठी यशराज मुखातेची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेचं दमदार कथानक, त्यात येणारे रंजक ट्विस्ट, त्याच तोडीच कलाकारांचं अभिनय या कारणांमुळे टीआरपीच्या यादीतही ही मालिका अग्रस्थानी असते.

'काही खरं नाही हिचं'; 'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीसाठी यशराज मुखातेची पोस्ट चर्चेत
Madhurani Prabhulkar, Yashraj MukhateImage Credit source: Hotstar, Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:14 AM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेचं दमदार कथानक, त्यात येणारे रंजक ट्विस्ट, त्याच तोडीच कलाकारांचं अभिनय या कारणांमुळे टीआरपीच्या यादीतही ही मालिका अग्रस्थानी असते. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, आशुतोष यांसारख्या कलाकारांचा सोशल मीडियावर वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून इतरही सेलिब्रिटींचा समावेश आहे. आता प्रसिद्ध संगीतकार यशराज मुखातेने (Yashraj Mukhate) त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ‘आई कुठे काय करते’साठी पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मालिकेचा एपिसोड पाहताना यशराजने अरुंधतीचा (Arundhati) फोटो काढला असून तोच फोटो त्याने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे.

‘हिचं काही खरं नाही’, असं त्याने एका पोस्टमध्ये लिहिलंय. तर दुसऱ्या फोटोवर त्याने लिहिलं, ‘होय, मी रविवारी दुपारी आई कुठे काय करते या मालिकेचे एपिसोड पाहतो. काय, कसं, का असे प्रश्न मला विचारू नका’. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. आता यशराज मुखातेदेखील या मालिकेचा चाहता आहे हे सिद्ध झालंय. तो नियमित ही मलिका पाहतो, असं त्यानेच या पोस्टद्वारे स्पष्ट केलंय.

सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. संजनाने देशमुखांचं घर स्वत:च्या नावावर केल्यापासून अनिरुद्ध आणि तिच्यात खटके उडू लागले आहेत. आता अनिरुद्ध संजनालाही घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. आपण एकत्र नाही राहू शकत असं तो संजनाला म्हणतो. हे ऐकून संजनालाही मोठा धक्का बसतो. आता ती हे नातं वाचवू शकेल का, अनिरुद्ध खरंच संजनाला घटस्फोट देणार का, हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पहायला मिळेल.

हेही वाचा:

Nagraj Manjule: “प्रेम करणं हाच विद्रोह”; पहा नागराज मंजुळेंचं गाजत असलेलं ‘विद्रोही’ भाषण

Mannat: शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला ट्विटरवर का होतोय ट्रेंड? ‘हे’ आहे खास कारण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.