Video | शिक्षा द्यायला आलेल्या आर्या मॅडमच्या तालावर ‘देवमाणसा’चे ठुमके, पाहा आर्या-डॉ.अजितकुमारचा धमाल डान्स
ऑनस्क्रीन जरी आर्या डॉक्टर अजितकुमार देवला शिक्षा द्यायला आली असली, तरी ऑफ स्क्रीन मात्र या दोघांची धमाल मस्ती सुरु आहे. देवीसिंगला फाशीपर्यंत पोहचवायला आलेल्या आर्या मॅडमच्या तालावर चक्क त्याने ठेका धरला आहे. हा डान्स व्हिडीओ अभिनेत्री सोनाली पाटील हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय. कारण, या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. इतकेच नव्हे तर, मालिकेत आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. यातच आता मालिकेत आणखी एका नव्या पत्राचे आगमन झाले आहे (Zee Marathi Devmanus Fame Actor Kiran Gaikwad and Sonali Patil dance video).
आता मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एन्ट्री झाली आहे. ‘वैजू नं 1’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटील आता ‘देवमाणूस’ या मालिकेत काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सध्या आर्या सरकारी वकील असल्याचं दिसतंय.
ऑनस्क्रीन जरी आर्या डॉक्टर अजितकुमार देवला शिक्षा द्यायला आली असली, तरी ऑफ स्क्रीन मात्र या दोघांची धमाल मस्ती सुरु आहे. देवीसिंगला फाशीपर्यंत पोहचवायला आलेल्या आर्या मॅडमच्या तालावर चक्क त्याने ठेका धरला आहे. हा डान्स व्हिडीओ अभिनेत्री सोनाली पाटील हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये ‘देवमाणूस’ या मलिकेतील ‘आर्या देशमुख’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील, ‘डॉक्टर अजितकुमार देव’ म्हणजेच किरण गायकवाड आणि विजय शिंदे अर्थात अभिनेता एकनाथ गीते हे तिन्ही कलाकार ‘आय रिको रिको’ या ट्रेंड गाण्यावर बॉलिवूडच्या काही सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या डान्स स्टेप्स केल्या आहेत. या व्हिडीओवर त्यांचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत.
कोण आहे सोनाली पाटील
सोनाली पाटील ही मुळची कोल्हापूरची आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिनं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलं. ते करत असतानाच सोनालीला ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. त्यानंतर ती ‘घाडगे अँड सून’, ‘देव पावला’ अशा मालिकांमध्ये झळकली. घाडगे अँड सून मालिकेचं शूट संपताच तिचं ‘वैजू नं 1’ मालिकेसाठी सिलेक्शन झालं. शिवाय सोनालीचा टिकटॉकवरही मोठा चाहता वर्ग होता. तिच्या व्हिडीओंना चाहत्यांची खास पसंती मिळते.
(Zee Marathi Devmanus Fame Actor Kiran Gaikwad and Sonali Patil dance video)
हेही वाचा :
Photo : मौनी रॉयचा ऑल ब्लॅक स्टनिंग अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर
Photo : ‘या’ अभिनेत्याच्या कन्येची सोशल मीडियावर चर्चा; हिच्यासमोर अंगुरी भाभी, गोरी मेमही फिक्या