AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईबरोबर अवॉर्ड शो बघायचो, तेव्हा… ‘देवमाणूस’ किरण गायकवाडला स्ट्रगलिंगच्या आठवणी

डबल धमाक्यानंतर किरण गायकवाडने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. (Marathi Actor Kiran Gaikwad )

आईबरोबर अवॉर्ड शो बघायचो, तेव्हा... 'देवमाणूस' किरण गायकवाडला स्ट्रगलिंगच्या आठवणी
अभिनेता किरण गायकवाड
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 4:57 PM

मुंबई : ‘देवमाणूस’ मालिकेतील डॉ. अजितकुमार देव या भूमिकेने अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला आहे. किरणला नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ मध्ये (Zee Marathi Awards 2020-21) डॉ. अजितकुमारच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायकासोबतच सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेचाही पुरस्कार मिळाला. या डबल धमाक्यानंतर किरणने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. (Zee Marathi Serial Dev Manus Fame Dr Ajitkumar Marathi Actor Kiran Gaikwad Instagram post on Struggling Days)

“तेव्हा वाटायचं आपणही ट्रॉफी घ्यावी”

“चार पाच वर्षांपूर्वी स्ट्रगल करत होतो. या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा घरी जेव्हा “आई” बरोबर कुठलाही अवॉर्ड शो बघायचो, तेव्हा असं वाटायचं की आपण पण कधीतरी या मंचावर जाऊन हातात ट्रॉफी घ्यावी. आपणही इथे एकदा तरी Dance करावा. आणि मग तेव्हापासून जो काही नाटकाच्या तालमीला उत्साह असायचा ना; विचारुच नका…” असं किरण गायकवाडने लिहिलं आहे.

शशांक केतकरचेही आभार

“याच मंचावरची आणखी एक आठवण ती म्हणजे कधीतरी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला मिळालं पाहिजे आणि आज “झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2020-21” या कार्यक्रमात ही दोन्ही स्वप्न पूर्ण झाली. झी मराठीचे कसे आभार मानू कळतच नाही. thank you ZEE Marathi for this golden opportunity. शशांक भावा तुला खरच thank you तू कमाल आहेस. मला खूप cooperate केलंस” अशा शब्दात किरणने अभिनेता शशांक केतकरचेही आभार मानले आहेत.

“और भी बोहोत कुछ बाकी है .. और भी है वो भी जल्दी पुरे हो जाएँगे. स्वप्नांपर्यंत पोहोचणं तसं अवघड नाहीये; फक्त जीव तोडून प्रामाणिक प्रयत्न केले पहिजेत. लोभ-आसावा” असं किरणने लिहिलं आहे. (Marathi Actor Kiran Gaikwad )

संबंधित बातम्या :

स्वीटू-शकू-आसावरीला पुरस्कार, ‘देवमाणूस’ बेस्ट खलनायक, झी मराठी अवॉर्ड विजेत्यांची यादी

‘माझा होशील ना’ अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान

(Zee Marathi Serial Dev Manus Fame Dr Ajitkumar Marathi Actor Kiran Gaikwad Instagram post on Struggling Days)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.