Devmanus | ‘देवमाणूस’ बंद होणार? ‘ती परत आलीय’ मालिकेच्या प्रोमोमुळे चर्चा

सध्या 'देवमाणूस' ही मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटमध्ये टीआरपीत अव्वल असल्याचं बोललं जातं. अग्गंबाई सूनबाईच्या जागी म्हणजे रात्री साडेआठ वाजता मालिकेचं शिफ्टिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Devmanus | 'देवमाणूस' बंद होणार? 'ती परत आलीय' मालिकेच्या प्रोमोमुळे चर्चा
देवमाणूसच्या जागी 'ती परत आलीय' ही नवी मालिका
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 9:21 AM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) बंद होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं कारण म्हणजे नव्या मालिकेचा प्रोमो. येत्या 16 ऑगस्टपासून ‘ती परत आलीय’ ही मालिका झी मराठीवर रात्री साडेदहा वाजता सुरु होणार असल्याचा प्रोमो रविवारी प्रसारित झाला आणि ‘देवमाणूस’च्या फॅन्सना मोठा धक्का बसला. त्यामुळे आपली लाडकी मालिका निरोप घेणार का, याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

श्रावण शुक्ल नवमी म्हणजेच येत्या 16 ऑगस्टपासून ‘ती परत आलीये’ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता पाहायला मिळणार आहे. दिग्गज अभिनेते विजय कदम यांचा एक प्रोमो नुकताच झी मराठीवर दाखवण्यात आला. त्यामुळे ‘देवमाणूस’ मालिका निरोप घेणार की वेळ बदलणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

‘देवमाणूस’ मालिकेत काय चाललंय ?

सध्या मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंह याची अकरा खुनांच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्याचं दाखवलं आहे. अजितकुमार घरी परतल्यावर डिम्पीसोबत त्याचं लग्न उरकण्याची घाई घरची मंडळी करत आहेत. मात्र मालिका निरोप घेत असल्यास पुढच्या महिन्याभरात देवीसिंह या हत्या प्रकरणांमध्ये पुन्हा कसा अडकणार, याचं कथानक दाखवावं लागेल. कारण अजितकुमारची निर्दोष सुटका झाल्यास प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे.

टीआरपीमध्ये अव्वल

सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका रात्री साडेदहाच्या स्लॉटमध्ये टीआरपीत अव्वल असल्याचं बोललं जातं. झी मराठी वाहिनीवरील अग्गंबाई सूनबाई ही मालिका पुढच्या महिन्यात निरोप घेणार आहे. तर कारभारी लयभारी, माझा होशील ना यासारख्या मालिका टीआरपीमध्ये मागे पडत आहेत. त्यामुळे ‘देवमाणूस’सारखी लोकप्रियतेच्या शिखरावरील मालिका बंद होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अग्गंबाई सूनबाईच्या जागी म्हणजे रात्री साडेआठ वाजता मालिकेचं शिफ्टिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री माधुरी पवारची (Madhuri Pawar) एंट्री झाली आहे. मालिका गुंडाळायची असती, तर नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री झाली नसती. झी मराठीवर रात्री साडेदहाच्या स्लॉटला रहस्यमय, थरारक अशा मालिका दाखवल्या जातात. त्यामुळे ‘ती परत आलीये’ या मालिकेसाठी ‘देवमाणूस’ची वेळ बदलण्याची चिन्हं आहेत.

‘बिग बॉस मराठी’साठी वेळेत बदल?

दुसरीकडे, कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरु होत आहे. या रिअॅलिटी शोची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये आतापासूनच ताणली गेली आहे. बिग बॉसची वेळ अद्याप निश्चित नसली, तरी रात्री दहानंतर असण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका ‘देवमाणूस’ला बसू शकतो. त्यामुळे मालिकेसाठी नवी वेळ निवडली जात असल्याचंही बोललं जातं. त्याच वेळी नवीन मालिका आणून साडेदहा वाजता प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्याचीही तयारी असू शकते.

हेही वाचा :

‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

‘देवमाणूस’मध्ये नवी ठसकेबाज एंट्री, ‘या’ व्यक्तीला पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ

(Zee Marathi Serial Devmanus may go off air soon as Ti Parat Aaliye Promo hits)

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.