Majhi Tujhi Reshim Gath : यश आणि नेहाची ‘ओम शांती ओम’ स्टाईल डेट, यश-नेहा प्रेमरंगी रंगले…
नेहा आणि यश रोमॅन्टिक डेटवर गेलेत. नेहासाठी हे सगळंच नवीन आहे. तिने कधीही न अनुभवलेल्या गोष्टी सध्या तिच्यासोबत घडत आहेत. त्यामुळे आपसूकच नेहाच्या डोळ्यात पाणी आलंय. पण हे अश्रु सुखद आहेत.
आयेशा सय्यद, मुंबई : झी मराठीवरील सिरीअल माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshim Gath) या मालिकेत सध्या रोमॅन्टिक माहोल पहायला मिळतोय. कारण नेहाने (Neha Kamat) यशला (Yashwardhan Chaudhari) आपल्या मनात असणाऱ्या प्रेम भावना बोलून दाखवल्या आहेत. यशने तर या आधीच नेहावरचं प्रेम तिच्या समोर व्यक्त केलं होतं. पण आता नेहानेही याला आपली संमती दिल्याने या दोघांना सध्या सगळं जग गुलाबी दिसतंय. नेहा आणि यश रोमॅन्टिक डेटवर (Neha Yash Romantic Date) गेलेत. तेही ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om) स्टाईलने. नेहासाठी हे सगळंच नवीन आहे. तिने कधीही न अनुभवलेल्या गोष्टी सध्या तिच्यासोबत घडत आहेत. त्यामुळे आपसुकच नेहाच्या डोळ्यात पाणी आलंय. पण हे अश्रु सुखद आहेत. दोघांमधलं नातं आता अधिकाधिक बहरताना दिसतंय. दोघेही प्रेम रंगात रंगले आहेत.
‘ओम शांती ओम’ स्टाईल डेट
दीपिका पादुकोणचा सुपरहीट सिनेमा ‘ओम शांती ओम’ स्टाईलने नेहा आणि यशची डेट पार पडली. यात नेहाला मिळेलेल्या गिफ्टमुळे नेहा स्वप्नात जाते. तिथं ती ओम शांती ओममधल्या मै एगर कहूँ या गाण्यावर यशसोबत डान्स करते. हे सगळंच खूप रोमॅन्टिक पद्धतीने घडतं.
View this post on Instagram
नेहाच्या डोळ्यात पाणी
नेहा आणि यश रोमॅन्टिक डेटवर गेलेत. नेहासाठी हे सगळंच नवीन आहे. तिने कधीही न अनुभवलेल्या गोष्टी सध्या तिच्यासोबत घडत आहेत. त्यामुळे आपसूकच नेहाच्या डोळ्यात पाणी आलंय. पण हे अश्रु सुखद आहेत. त्यानंतर यश तिला समजावतो की, “हे सगळं तुझ्यासाठी नवीन असलं तरी ते आपल्यासाठी खास आहे. त्यामुळे हे सगळं इन्जॉय कर…”
View this post on Instagram
माझी तुझी रेशीमगाठ मालिका सध्या लोकांच्या पसंतीला उतरतेय. यातली लहानशी परी तर सर्वांचं लक्ष वेधून घेते. आता यश त्याच्या लाडक्या फ्रेंडला कसं आपलंसं करतो आणि या दोघांचा लग्नापर्यंतचा प्रवास कसा घडतो हे पाहणं महत्वाचं असेल.
संबंधित बातम्या