कॉमेडियन अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कलाविश्वाला मोठा धक्का... प्रसिद्ध कॉमेडियनचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सेलिब्रिटींसह चाहत्यांनी व्यक्त केलं दुःख.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

कॉमेडियन अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 2:41 PM

मुंबई : दाक्षिणात्य कॉमेडियन आणि अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. अल्लू रमेश यांचं निधन झाल्यामुळे टॉलिवूड इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अल्लू रमेश यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी रमेश अल्लू यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्लू रमेश यांच्या निधनाची बातमी कळताच सेलिब्रिटी आणि चाहते यांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्लू रमेश यांना श्रद्धांजली वाहत आहेत. टॉलिवूड सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद रवी यांनी अल्लू रमेश यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र अल्लू रमेश यांच्या निधनाची चर्चा रंगत आहे.

आनंद रवी यांनी फेसबूकच्या माध्यमातून अल्लू रमेश यांच्या निधनाची माहिती दिली आहे. अल्लू रमेश यांचा एक फोटो पोस्ट करत रवी आनंद रवी म्हणाले, ‘पहिल्या दिवसापासून तुम्ही कायम माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलात. मी आजही तुमचा आवाज ऐकू शकतो. रमेश गुरू तुमचं निधन झालं आहे… यावर विश्वास बसत नाही. तुमची कायम आठवण येईल… ओम शांती…’

हे सुद्धा वाचा

मूळचे विझागचे असलेले अल्लू रमेश यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात थिएटर क्षेत्रातून केली. अल्लू रमेश त्यांच्या अनेक कॉमिक भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘चिरुजल्लू’ सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अल्लू रमेश यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

पहिल्या सिनेमानंतर अल्लू रमेश यांनी ‘टोलू बोम्मलता’, ‘मथुरा वाइन’, ‘वीधी’, ‘ब्लेड’ ‘बाबजी और नेपोलियन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अनुकोनी प्रयाणम’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.

कॉमेडी, सिनेमासोबतच अल्लू रमेश यांनी वेब सीरिजमध्ये देखील काम केलं. ‘मां विदकुलु’ सीरिजमध्ये रमेश अल्लू मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. दमदार अभिनय कौशल्य आणि कॉमिक टायमिंगमुळे अल्लू रमेश प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय स्टार बनले होते. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.