Sudheer Varma | तुनिशानंतर ‘या’ तरुण अभिनेत्याची आत्महत्या; फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा

सुधीर वर्माने त्याच्या खासगी आयुष्यातील काही समस्यांमुळे आत्महत्या केल्याचं समजतंय. तो 33 वर्षांचा होता. सहकलाकार सुधाकर कोमकुला याने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. सुधीरच्या आत्महत्येनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Sudheer Varma | तुनिशानंतर 'या' तरुण अभिनेत्याची आत्महत्या; फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा
Telugu actor Sudhir VarmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 8:01 AM

विशाखापट्टणम: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलुगू अभिनेता सुधीर वर्मा याने सोमवारी (23 जानेवारी) आत्महत्या केली. विशाखापट्टणम इथल्या राहत्या घरी या अभिनेत्याने आत्महत्या केली. मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं, यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. सुधीर वर्माने त्याच्या खासगी आयुष्यातील काही समस्यांमुळे आत्महत्या केल्याचं समजतंय. तो 33 वर्षांचा होता. सहकलाकार सुधाकर कोमकुला याने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. सुधीरच्या आत्महत्येनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सुधीरच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

‘तुझ्याशी भेट होणं आणि तुझ्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. पण आज तू नाहीय, यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे’, अशी पोस्ट सुधाकरने लिहिली. सुधाकर आणि सुधीर यांनी ‘कुंदनपू बोम्मा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

हे सुद्धा वाचा

सुधीरने 2013 मध्ये ‘स्वामी रा रा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र त्याच्या या पदार्पणाच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतरच्या ‘कुंदनपू बोम्मा’ या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.

सुधीरच्या करिअरमधील दुसरा चित्रपट ‘दोचे’ हासुद्धा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. यामध्ये त्याच्यासोबत नाग चैतन्यची भूमिका होती. मात्र केशवा आणि रणरंगम यांसारख्या चित्रपटांमुळे सुधीर प्रकाशझोतात आला.

2022 मध्ये त्याच्या ‘साकिनी दाकिनी’ या ॲक्शन-कॉमेडी चित्रपटाला भरपूर यश मिळालं. यामध्ये त्याच्यासोबत निवेता थॉमस आणि रेगिना कॅसँड्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिडनाइट रनर्स’ या साऊथ कोरियन चित्रपटाचा हा रिमेक होता.

काही दिवसांपूर्वीच टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनं कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या 21 व्या वर्षी तुनिशाने जगाचा निरोप घेतला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.