World Cup 2023 : भारताच्या विजयानंतर विवस्त्र होणार होती ‘ही’ अभिनेत्री, पराभवानंतर म्हणते…
World Cup 2023 : भारताच्या विजयानंतर विवस्त्र फिरणारअसल्याची घोषणा करणारी 'ही' अभिनेत्री पराभवानंतर म्हणते..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा..., भारताच्या पराभवानंतर सर्वसामान्य जनता आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत भावना व्यक्त
मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या सेमी फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत फायनलमध्ये स्थान पक्क केलं. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. सांगायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं आहे. वर्ल्ड कप 2023 फायनल पूर्वी प्रत्येकाची नजर वर्ल्ड कप होती. वर्ल्ड कप 2023 फायनल पूर्वी अभिनेत्री रेखा बोज हिने भारत जिंकल्यानंतर विवस्त्र फिरणार असल्याची घोषणा केली होती. आता भारताच्या पराभवानंतर देखील अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तर समुद्रकिनारी विवस्त्र धावणार असल्याचं अभिनेत्री रेखा बोज जाहीर केलं होतं. दरम्यान, भारताच्या पराभावानंतर अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर आहे. ‘प्रचंड दुःख झालं… पण भारत महान आहे… पूर्ण टुर्नामेंटमध्ये कामगिरी उत्तम होती… जय हिंद..’ असं वक्तव्य रेखा बोज हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.
View this post on Instagram
रेखा बोज हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट तर शेअर केली, पण अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘भारताच्या विजयापुढे माझं वक्तव्य काहीही नाही… प्रचंड दुःख होत आहे…’ सध्या सर्वत्र रेखा बोज हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, वर्ल्ड कप 2023 फायनल पूर्वी रेखा बोज हिने विवस्त्र फिरण्याची घोषणा केल्यानंतर अभिनेत्री ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता देखील रेखा बोज हिच्या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.
कोण आहे रेखा बोज?
रेखा बोज 24 वर्षीय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. रेखा हिने ‘रंगीला’, ‘कलाया तस्माई नमः’, ‘दामिनी विला’ यांसारख्या अनेक सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. रेखा बोज हिने 2016 मध्ये करियरची सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
रेखा बोज सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.