तब्बल 150 तोळं सोन्याची चोरी करून गोव्याला गेली फिरायला; अखेर अभिनेत्री अटकेत
चार विविध प्रकरणांमध्ये तब्बल 150 तोळं सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर तेलुगू अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौम्या शेट्टी गोव्याला फिरायला गेली. तिथून तिने सोशल मीडियावर रिल्ससुद्धा पोस्ट केले. आता वैझाग पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केली आहे.
वैझाग : 8 मार्च 2024 | तेलुगू चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौम्या शेट्टीला वैझाग शहर पोलिसांनी अटक केली आहे. सोनं चोरीच्या आरोपाखाली सौम्याला अटक करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली होती. दोंडापार्ती याठिकाणी बालाजी मेट्रो रेसिडेन्सीमध्ये ही चोरी झाली. त्यानंतर मालक प्रसाद बाबू यांनी तब्बल 150 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी अकरा जणांवर संशय व्यक्त केला. त्यापैकी नंतर तीन संशयितांची चौकशी केली आणि यामध्ये सौम्याचाही समावेश होता.
विशाखापट्टणममधील निवृत्त पोस्ट कर्मचाऱ्याच्या घरात सौम्याने 150 तोळं सोन्याची चोरी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याने चार वेगवेगळ्या प्रकरणातून ही चोरी केली आणि त्यानंतर गोव्याला फिरायला गेली. प्रसाद बाबू यांच्या घरात सौम्या बाथरुमद्वारे शिरली. तिथून बेडरुममध्ये जाऊन तिने एक किलोचं सोनं चोरलं आणि त्यानंतर गोव्याला पळाली. अटकेनंतर सौम्याने तिच्या गुन्ह्याची कबुली दिली.
View this post on Instagram
चोरी केलेले सोन्याचे दागिने विकून त्या पैशांत सौम्या गोव्याला फिरायला गेली. गोव्याला गेल्यानंतरही तिने सोशल मीडियावर काही रिल्स पोस्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 74 ग्राम सोनं जप्त केलंय. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. सौम्या ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्ससुद्धा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 10 कोटी फॉलोअर्स आहेत. तिने काही तेलुगू चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.