या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये जेवढा उत्साह होता, तेवढीच त्यांची थिएटरमध्ये गेल्यानंतर निराशा झाली. सोशल मीडियावर या चित्रपटातील विविध चुका व्हायरल होत आहेत. 'आदिपुरुष' ज्या 10 चुकांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होतोय, ते जाणून घेऊयात..
Prabhas and Saif in Adipurush
Image Credit source: Twitter
Follow us on
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात प्रभास, क्रिती सनॉन, सनी सिंह, सैफ अली खान, देवदत्त नागे यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये जेवढा उत्साह होता, तेवढीच त्यांची थिएटरमध्ये गेल्यानंतर निराशा झाली. सोशल मीडियावर या चित्रपटातील विविध चुका व्हायरल होत आहेत. ‘आदिपुरुष’ ज्या 10 चुकांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होतोय, ते जाणून घेऊयात..
‘आदिपुरुष’च्या कथेची सुरुवात थेट राघव (राम), जानकी (सीता) आणि शेषच्या (लक्ष्मण) वनवासापासून सुरू होते. सीताहरण आणि राम-रावणाचं युद्ध याच दोन गोष्टींवर चित्रपटात भर देण्यात आला आहे. रामायणातील इतर काही पात्रांना चित्रपटात स्क्रीन-टाइम दिला असता, तर कथा अधिक रंजक झाली असती.
‘आदिपुरुष’मधील मायावी राक्षसांचा लूक पाहून हॉलिवूड चित्रपटांची आठवण येते. या म्हणूनच मार्व्हल जनरेशचनं रामायण, अशी टीका नेटकऱ्यांकडून होत आहे. लंकेतील राक्षसांचा लूक इतका चित्रविचित्र दाखवला आहे, जे पाहून हे नक्कीच रामायण आहे का, असा प्रश्न पडतो.
आदिपुरुषमध्ये व्हिएफएक्सवर सर्वाधिक पैसा खर्च करण्यात आला आहे. मात्र तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातील VFX काही कमालीचं नाही. कधी त्यातील पात्रं आकाराने अचानक लहान आणि अचानक मोठे वाटू लागतात. व्हिएफएक्समुळे रावणाची चालण्याची पद्धतसुद्धा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मधल्या संजय दत्तसारखी वाटू लागते.
रावणाची लंका ही सोन्याची असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र ‘आदिपुरुष’मध्ये दाखवलेल्या रावणाची लंका ही संपूर्णपणे काळी आहे. ‘केजीएफ’ या चित्रपटातील कोळशाच्या खाणीप्रमाणे ही संपूर्ण लंका वाटू लागते. इतकंच नव्हे तर अशोक वाटिकासुद्धा काळ्या दगडांचीच दाखवण्यात आली आहे.
रावणाच्या लूकवरून सुरुवातीपासूनच ट्रोलिंग सुरू आहे. Faux Hawk हेअरकटवाला रावण पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. त्याहूनही विचित्र वाटणारी बाब म्हणजे त्याचं पुष्पकविमान. पुष्पक विमानाऐवजी एक अशा पक्षावर रावण विराजमान होतो, जो धड ड्रॅगनसुद्धा वाटत नाही किंवा वटवाघूळही वाटत नाही.
राम सेतूचं नाव राम सेतू या कारणासाठी ठेवण्यात आलं होतं, कारण समुद्रात तरंगणाऱ्या त्या दगडांवर रामाचं नाव लिहिलेलं असतं. मात्र हीच गोष्ट आदिपुरुषमध्ये स्पष्ट दाखवण्यात आली नाही. रामाच्या नावाचा उच्चार घेऊन दगड समुद्रात टाकले जातात, मात्र त्यावर रामाचं नावंच लिहिलेलं नसतं.
चित्रपटातील जानकीचं आणखी एक दृश्य पाहून प्रेक्षक चक्रावले आहेत. या दृश्यामध्ये रावण आणि इंद्रजीत हे जानकीला युद्धभूमीवर घेऊन येतात. युद्धाची सुरुवात झालेली नसते, मात्र त्यापूर्वी युद्धभूमीवर साखळ्यांमध्ये जानकीला आणलं जातं. मात्र एका मायावी राक्षसाने जानकीचं रुप धारण केलेलं असतं. रामायणाच्या खऱ्या कथेपेक्षा हा सीन पूर्णपणे वेगळा वाटतो.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटातील डायलॉग्सची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. रामायणाच्या कथेला असे डायलॉग्स शोभत नसल्याची टीका प्रेक्षक करत आहेत. तर काहींनी भावना दुखावल्याचाही आरोप केला आहे.
रावणाचा पुत्र इंद्रजितच्या अंगावरील टॅटू पाहून नेटकऱ्यांनी त्याचीही खिल्ली उडवली आहे. लंकेतील पात्रांचा लूक सर्वांत विचित्र वाटतो. कुंभकरणाचं पात्र अवघ्या काही सेकंदांसाठी दाखवण्यात आलं आहे. तिथेही दिग्दर्शकांनी फार घाई केल्याचं दिसून येतं.
आदिपुरुषमधील बहुतांश पात्रांना फारसे डायलॉग्सच नाहीत. सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका चांगली साकारली, मात्र त्याच्या तोंडी फारसे डायलॉग्सच नाहीत.