Thackeray Family: ठाकरे कुटुंबातला ‘तो’ मुलगा करणार नव्या प्रवासाला सुरुवात, चर्चांना उधाण

Thackeray Family: राजकारणात सक्रिय असलेल्या ठाकरे कुटुंबातील 'तो' मुलगा करणार नव्या प्रवासाला सुरुवात... जाणून तुम्हालाही होईल आश्चर्य... सर्वत्र चर्चांना उधाण...

Thackeray Family: ठाकरे कुटुंबातला 'तो' मुलगा करणार नव्या प्रवासाला सुरुवात, चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 9:57 AM

Thackeray Family: हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राजकारणाला एक नवी दिशा मिळाली. ठाकरे कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकीय क्षेत्र. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक वलय आहे. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच एक वजन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र, पुतणे, नातू आज राजकारणात सक्रीय आहे. पण यामध्ये एक असाही ठाकरे आहे, जो नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. सध्या सर्वत्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाची चर्चा रंगली आहे.

हा ठाकरे म्हणजे जयदेव आणि स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य आहे. ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण त्याचबरोबर त्या चित्रपट निर्मितीमध्ये सुद्धा सक्रीय आहेत. बरेच ठाकरे राजकारणात आहेत. ऐश्वर्य बॉलिवूडमध्ये जोरदार पाऊल ठेवणार आहे.

ऐश्वर्य ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2025 मध्ये ऐश्वर्य ठाकरे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ऐश्वर्य याने 5 चित्रपटाच्या सेटवर असिस्टेंट म्हणून काम केलं आहे.

ऐश्वर्य ठाकरे याला कोणचा दिग्दर्शक लॉन्च करणार आहे किंवा सिनेमाचं नाव काय आहे… यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऐश्वर्य याच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने अद्याप अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नसली तरी, ऐश्वर्य सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

सोशल मीडियावर ऐश्वर्या कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ऐश्वर्य याने फिल्ममेकर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.