Thalapathy Vijay: लग्नाच्या 23 वर्षांनंतर साऊथ सुपरस्टार विजय पत्नीला देणार घटस्फोट? काय आहे सत्य?

साऊथ इंडस्ट्रीतील आणखी एक प्रसिद्ध जोडी होणार विभक्त? थलपती विजयच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Thalapathy Vijay: लग्नाच्या 23 वर्षांनंतर साऊथ सुपरस्टार विजय पत्नीला देणार घटस्फोट? काय आहे सत्य?
Thalapathy Vijay: लग्नाच्या 23 वर्षांनंतर साऊथ सुपरस्टार विजय पत्नीला देणार घटस्फोट? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 10:09 AM

चेन्नई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एका जोडीच्या विभक्त होण्याची माहिती समोर येत आहे. साऊथ सुपरस्टार थलपती विजय हा लग्नाच्या 23 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विजय आणि त्याची पत्नी संगीता यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव जेसन तर मुलीचं नाव दिव्य आहे. घटस्फोटाच्या या चर्चांवर दोघांनी अद्याप कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. थलपती विजय सध्या त्याच्या आगामी ‘वारिसू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही काळापासून तो पत्नीपासून वेगळं राहत असल्याचंही म्हटलं जात आहे.

थलपती विजय आणि संगीताने परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी विजयने कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावली किंवा चित्रपटाचं प्रमोशन केलं तर त्याच्यासोबत पत्नी संगीता नेहमीच दिसायची. मात्र गेल्या काही काळापासून हे दोघं कोणत्याच कार्यक्रमात एकत्र दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अटलीच्या पत्नीचं बेबी शॉवर होतं. त्यालासुद्धा एकट्या विजयने हजेरी लावली होती. विजयच्या वारिसू या चित्रपटाच्या म्युझिक लाँचलाही संगीता गैरहजर होती.

थलपती विजय आणि संगीताच्या घटस्फोटाच्या चर्चा असल्या तरी दुसरीकडे या दोघांच्या एका जवळच्या व्यक्तीने त्यात काहीच तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्या व्यक्तीने म्हटलं, “संगीता मुलांसोबत अमेरिकेला फिरायला गेली आहे. त्यामुळे ती म्युझिक लाँच आणि बेबी शॉवरला जाऊ शकली नाही. संगीत आणि विजयच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही.”

हे सुद्धा वाचा

1996 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर संगीता आणि विजयची पहिल्यांदा भेट झाली होती. संगीता ही तेव्हा विजयची खूप मोठी चाहती होती. विजयचा प्रत्येक चित्रपट ती आवर्जून पाहायची. त्याला भेटण्यासाठी ती युकेहून चेन्नईला गेली होती. चित्रपटाच्या सेटवर या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला, तेव्हा संगीताने त्याच्या कामाचं खूप कौतुक केलं. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेम झालं. जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.