Thar trailer: अनिल कपूर-हर्षवर्धन कपूर यांची ऑनस्क्रीन टक्कर; ‘थार’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर (Harsh Varrdhan Kapoor) यांचा आगामी चित्रपट 'थार'ची (Thar) घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर हे पहिल्यांदाच मुलासोबत स्क्रीन शेअर करत आहेत.

Thar trailer: अनिल कपूर-हर्षवर्धन कपूर यांची ऑनस्क्रीन टक्कर; 'थार'च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
Thar MovieImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:48 PM

अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर (Harsh Varrdhan Kapoor) यांचा आगामी चित्रपट ‘थार’ची (Thar) घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर हे पहिल्यांदाच मुलासोबत स्क्रीन शेअर करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये हर्षवर्धन आणि अनिल कपूर यांच्यासोबतच सतीश कौशिक आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर या चित्रपटाचा ट्रेलर अपलोड केला आहे. या ट्रेलरची सुरुवात पोलिसाच्या भूमिकेतील अनिल कपूर यांच्या दृश्याने होते. सतीश कौशिक यांच्यासोबत मिळून ते एका हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर ट्रेलरमध्ये हर्षवर्धनची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. हर्षवर्धन यामध्ये डिलरच्या भूमिकेत आहे. सीरिजच्या कथेला राजस्थानमधील एका गावाची पार्श्वभूमी देण्यात आली आहे. अँटिक डिलर असलेला हर्षवर्धन राजस्थानमधील त्याच शहरात पाऊल ठेवतो, जिथे अनिल कपूर पोलीस अधिकारी असतात. हत्येचं गूढ उकलण्यासाठी अनिल आणि हर्षवर्धन कपूर हे समोरासमोर येतात.

या चित्रपटात हर्षवर्धन वडिलांना चांगलीच टक्कर देणार असल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येतंय. अनिल कपूर यांच्या चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन राज सिंह चौधरी यांनी केलं असून दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अनिल कपूर फिल्म कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राज यांनी याची कथासुद्धा लिहिली आहे. तर अनुराग कश्यपने संवाद लिहिले आहेत.

हेही वाचा:

बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानचा खास अंदाज; पहा PHOTO

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.