Video | परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याला पाहून केले थेट ‘हे’ कृत्य, उपस्थित लोकही हैराण
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. यांची पहिली भेट विदेशात झाली.

मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये पार पडले. यांच्या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री उपस्थित होते. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा अत्यंत शाही पद्धतीने पार पडलाय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा दिल्ली येते 13 मे रोजी साखरपुडा पार पडला. यानंतर यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात करण्यात आली. उदयपूरच्या लीला पॅलेस आणि ताज लेक पॅलेसमध्ये यांचा विवाहसोहळा हा पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा लग्नात जबरदस्त असा लूक हा बघायला मिळाला.
आता नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ परिणीती चोप्रा हिनेच शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या संपूर्ण लग्नाची झलक ही बघायला मिळतेय. या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये चक्क परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याला पाहून जोरात ओरडताना देखील दिसतंय. इतकेच नाही तर परिणीती चोप्रा हिला हातवारे करताना राघव चड्ढा हा देखील दिसतोय. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या शाही विवाहसोहळ्याची एक झलक या व्हिडीओमधून स्पष्टपणे बघायला मिळतंय.
View this post on Instagram
लग्न मंडपात राघव चड्ढा हा दाखल होत असतानाच परिणीती चोप्रा ही त्याला बघते. इतक्यावरच परिणीती ही थांबत नाही तर राघव याला पाहून ओरडत ती त्याला आवाज देताना दिसतंय. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. परिणीती चोप्रा ही सध्या दिल्लीमध्ये राघव चड्ढा याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसतंय.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली. मुंबईमध्ये बऱ्याच वेळा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे स्पाॅट झाले. यांचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले.