वर्षातील सगळ्यात मोठा चित्रपट, भारत पाकिस्तान युद्धाचा थरार दाखवणार, निखिल द्विवेदीची घोषणा!

लिवूड सेलिब्रिटींनी प्रजासत्ताक दिन जोरदार साजरा केला आहे. काहींनी ट्विटरवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्यातर काहींनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वर्षातील सगळ्यात मोठा चित्रपट, भारत पाकिस्तान युद्धाचा थरार दाखवणार, निखिल द्विवेदीची घोषणा!
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 9:34 AM

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रजासत्ताक दिन जोरदार साजरा केला आहे. काहींनी ट्विटरवरून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करत शुभेच्छा दिल्या. चित्रपट निर्माते-अभिनेता निखिल द्विवेदी (Nikhil Dwivedi) यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक मोठी घोषणा केली आहे. निखिलने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव 1971 असे असून तो चित्रपट भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.या चित्रपटात भारत पाकिस्तान युद्धाचा थरार दाखवण्यात येणार आहे. (The 1971 film was announced by Nikhil Dwivedi)

निखिल निर्मित हा चित्रपट वर्षाच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल. मीडिया रिपोर्टनुसार, निखिल बर्‍याच दिवसांपासून चित्रपटावर काम करत होते आणि प्रजासत्ताक दिनी त्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. याबाबत निखिल म्हणाले की, “भारताने कधी खरे युद्ध पाहिले नाही. माझा प्रयत्न असा असेल की मी हे शक्य तितके वास्तविक ठेवून चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, चित्रपटाच्या कास्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांनी सांगितले की, या चित्रपटाच्या कास्टिंगचे काम अद्याप सुरू आहे आणि लवकरच निर्माते याविषयी माहिती देतील. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने प्रजासत्ताक दिनानिमित्त चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. आज जॉन अब्राहमने त्याच्या आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) ची रिलीज तारीख जाहिर केली आहे. या चित्रपटाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 14 मे रोजी रिलीज होईल.

यासोबतच मोठी बातमी अशी आहे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहमने हातात देशाचा झेंडा पकडत पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला फोटो शेअर करत लिहिले आहे की, तन मन धन पेक्षा महत्वाचे जण गण मन, सत्यमेव जयते 2 च्या टिमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! 14 मे ला ईदच्या दिवशी भेटूयात सत्यमेव जयते 2

संबंधित बातम्या : 

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीकडून घोडचूक; नेटिझन्सनी झापलं

‘तुझा आणि सुशांतचा फोटो पाठव’, फॅन्सची मागणी, त्यावर अंकिता लोखंडेने पाठवला ‘तो’ फोटो…

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

(The 1971 film was announced by Nikhil Dwivedi)

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.