50 वर्षाच्या मलायका अरोरा हिच्यासोबत ‘हा’ अभिनेता झाला रोमांटिक, अर्जुन कपूरला सोडून चक्क..
Malaika Arora : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना मलायका अरोरा दिसते.
मुंबई : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मलायका अरोरा ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. मलायका अरोरा कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. मलायका अरोरा हिने 2016 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेत सर्वांनाच मोठा धक्का दिला. हेच नाही तर घटस्फोटानंतरही दोघे अनेकदा एकसोबत स्पाॅट देखील झालेत.
मलायका अरोरा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर आता अरबाज खान याने शुरा खान हिच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नातील अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसले. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान देखील या लग्नाला उपस्थित असून अरहान आपल्याच वडिलांच्या लग्नात धमाल करताना दिसला. एका व्हिडीओमध्ये तर तो डान्स देखील करत होता.
आता नुकताच मलायका अरोरा आणि रंधावा यांच्या डान्सचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हेच नाही तर बन जा मेरा रानी या गाण्यावर मलायका अरोरा आणि रंधावा हे धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. दोघेही अत्यंत रोमांटिक होताना दिसले. आता यांच्या डान्सचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. धमाकेदार डान्स यांनी केलाय.
रंधावा आणि मलायका अरोरा यांच्या डान्सने स्टेजवर आगच लावून दिली. उपस्थितांनी टाळ्या वाजवत यांच्या डान्सचे काैतुक देखील केले. आता यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा लूक चाहत्यांना आवडला आहे. मात्र, अर्जुनला सोडून चक्क इतर अभिनेत्यासोबत मलायका रोमांटिक होताना दिसली. यावरून चर्चा सुरू झाल्यात.
काही दिवसांपूर्वीच ‘झलक दिखला जा’च्या सेटवरच नोरा फतेही हिच्यासोबत जबरदस्त असा डान्स करताना मलायका अरोरा ही दिसली होती. मलायका अरोरा हिच्या डान्सचे लोक मोठे चाहते आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायकाच्या बर्थडे निमित्त खास पार्टीचे आयोजन अर्जुन कपूर याने केले होते.