‘ॲनिमल’मध्ये काम करण्यास या अभिनेत्याने दिला थेट नकार, रणबीर कपूर आणि संदीप रेड्डी वांगा यांच्याकडून…
रणबीर कपूर यांच्या ॲनिमल चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे नक्कीच बघायला मिळत आहे. ॲनिमल हा चित्रपट बहुचर्चित चित्रपट नक्कीच ठरलाय. अनेकांनी थेट रणबीर कपूर याच्या भूमिकेचे देखील मोठे काैतुक केल्याचे बघायला मिळतंय.
मुंबई : रणबीर कपूर याचा ॲनिमल हा चित्रपट सध्या तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक क्रेझ ही बघायला मिळतंय. हा चित्रपट धमाका करत आहे. ॲनिमल या चित्रपटामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये यांची देखील भूमिका बघायला मिळते. मात्र, उपेंद्र लिमये यांची अत्यंत छोटी अशी भूमिका आहे. उपेंद्र लिमये यांच्या भूमिकेचे काैतुक केले जातंय. धक्कादायक म्हणजे उपेंद्र लिमये यांनी ॲनिमल हा चित्रपट करण्यास सुरूवातीला स्पष्टपणे नकार दिला. थेट रणबीर कपूर याच्यासोबत काम करण्यास उपेंद्र लिमये यांनी नकार दिला.
उपेंद्र लिमये यांनी नुकताच याबद्दल खुलासा केला. उपेंद्र लिमये म्हणाले की, संदीप रेड्डी वांगा यांच्या टीमकडून मला काॅल आला. मात्र, मी दहा मिनिटांची भूमिका करण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर त्यांनी मला म्हटले की, एकदा तुम्ही संदीप रेड्डी वांगा यांना भेटण्यासाठी या…मग मी असे ठरवले की, संदीप रेड्डी वांगा यांना भेटून चित्रपटाला नकार द्यायचा.
संदीप रेड्डी वांगा यांना मी भेटलो. मात्र, मी त्यांना चित्रपटासाठी नकारच देऊ शकतो नाही. संदीप रेड्डी वांगा यांनी मला बऱ्याच गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मी चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटात भूमिका करण्याची माझी अजिबातच काही इच्छा नव्हती. मात्र, मी नकार द्यायला गेलो आणि होकार देऊन आलो.
पुढे उपेंद्र लिमये म्हणाले की, मी त्या अंडरविअरच्या सीनला नकार दिला होता. मात्र, परत मला संदीप रेड्डी वांगा यांनी समजावले. त्यांनी मला म्हटले की, तो सीन चांगल्याप्रकारे मी दाखवणार आहे. शेवटी मी त्यासाठी होकार दिला. परंतू मला वाटले होते की, रणबीर कपूर हा त्या सीनसाठी नकार देईल. मात्र, मी चुकीचा होतो.
रणबीर कपूर याने देखील त्या अंडरविअरच्या सीनला होकार दिला. विशेष म्हणजे जरी उपेंद्र लिमये यांची अगदी छोटी भूमिका चित्रपटात असेल. परंतू त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलेच प्रेम दिल्याचे बघायला मिळत आहे. धमाकेदार भूमिका करताना उपेंद्र लिमये हे दिसले. नुकताच उपेंद्र लिमये यांनी याबद्दल सर्व खुलासा हा केला आहे.