अभिनेत्याला सुनावली फाशीची शिक्षा, शहीद झाल्याची बातमी पसरली, पण होता जिवंत, नंतर रचला इतिहास…
स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या आझाद हिंद फौजेच्या तरुणांना इंग्रजांनी तुरुंगात डांबण्यास सुरवात केली. त्यात नझीर यालाही पकडण्यात आले. दरम्यान, गाजीपूरमध्ये बातमी पसरली की इंग्रजांनी नझीरला चकमकीत मारले. ही बातमी समजताच गावात शोककळा पसरली. नझीरला गावकऱ्यांनी शहीदचा दर्जा दिला. पण...
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. दुसरे महायुध्द सुरु झाले होते. त्या युद्धात त्यांनी भाग घेतला. मात्र, याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा स्वतंत्र भारतासाठी संघर्ष सुरु होता. मग, ते आझाद हिंद फौजेत सामील झाले. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांच्यावर प्रसिद्धीसाठी लेखनाची जबाबदारी सोपवली. पण, इंग्रजांनी स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या आझाद हिंद फौजेच्या तरुणांना तुरुंगात डांबले. त्यातील अनेकांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यामध्ये या तरुणाचाही समावेश होता. फाशी देण्यासाठी त्याला नेण्यात येत होते. मात्र, त्याला सहकाऱ्यांनी वाचविले. पण, त्याच्या गावी तो शहीद झाल्याची बातमी पसरली. काही दिवसांनी तो जिवंत असल्याचे पत्र कुटुंबाला मिळाले. तो सुखरूप घरी परतला आणि मग त्याने चित्रपट सृष्टीत एक नवा इतिहास रचला. हा तरुण होता नाझीर हुसेन.
उत्तर प्रदेशातील उसिया गावात 15 मे 1922 रोजी नझीर हुसेन याचा जन्म झाला. वडील शाहबाज खान हे भारतीय रेल्वेत गार्ड होते. वयात आल्यावर वडिलांच्या शिफारशीवरून त्याला रेल्वेत फायरमन म्हणून सरकारी नोकरी मिळाली. पण, काही महिन्यांनी ती नोकरी सोडून ब्रिटीश सैन्यात दाखल झाले. त्याचवेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्याला युद्धभूमीवर पाठविण्यात आले. मलेशिया आणि सिंगापूरमध्ये त्याला पोस्टिंग मिळाल्या होत्या. याच काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौज तयार झाली होती. त्यांच्या स्वतंत्र भारताची प्रेरणा घेऊन नझीर आझाद हिंद फौजेत दाखल झाला.
नझीरला शहीद ठरवले…
नझीर याच्या या बदलाची कल्पना इंग्रजांना लागली. इंग्रजांनी त्याला युद्धादरम्यानच कैद करून मलेशियाच्या तुरुंगात डांबले. मात्र, काही वेळाने त्याची सुटका करून त्याला भारतात पाठवण्यात आले. भारतात परत आल्यानंतर मात्र त्याने स्वातंत्र्यासाठी आवाज उठवण्यास सुरवात केली. स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या आझाद हिंद फौजेच्या तरुणांना इंग्रजांनी तुरुंगात डांबण्यास सुरवात केली. त्यात नझीर यालाही पकडण्यात आले. दरम्यान, गाजीपूरमध्ये बातमी पसरली की इंग्रजांनी नझीरला चकमकीत मारले. ही बातमी समजताच गावात शोककळा पसरली. नझीरला गावकऱ्यांनी शहीदचा दर्जा दिला. पण…
जिवंत असल्याचे पत्र आले आणि…
इंग्रजांनी पकडलेल्या त्या तरुणांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. नझीरला लाल किल्ल्यावर फाशी दिली जाणार होती. त्याला घेऊन इंग्रज हावडाहून दिल्लीला ट्रेनने जात होते. वाटेत दिलदारनगर जंक्शन येणार होते. यापूर्वी रेल्वेत नोकरी केल्यामुळे त्याला सर्व जंक्शनची माहिती होती. त्याने चतुराईने इंग्रजांकडून पेन, कागद घेतला आणि कुटुंबाला पत्र लिहिले. अनेक दिवस कुटुंबियांना त्याची कोणतीही बातमी मिळाली नव्हती. त्यामुळे ते चिंतेत असतील हे त्याला माहित होते. पण, तुरुंगात असल्याने मृत समजून शहीद केल्याची त्याला कल्पनाही नव्हती. ते स्टेशन येताच नझीरने ते पत्र गाडीबाहेर फेकले. गाडी काही अंतर पार करून पुढे गेली आणि आझाद हिंद फौजेच्या काही सशस्त्र तरुणांनी त्या गाडीतील जवानांना वाचवले. याची माहिती कुठे बाहेर पडू नये यासाठी याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. इकडे नझीर याने ते लिहिलेले पत्र त्याच्या गावी पोहोचले आणि त्याच्या घरी आनंदोत्सव सुरु झाला.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुटका करण्यात आली. नझीर हुसेन हे स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांना आयुष्यभर मोफत रेल्वे पास मिळाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे नझीर याला काही काम नवहते. काही काळाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचे भाऊ सरतचंद्र बोस यांच्यामार्फत त्यांना मदत पाठविली. सरतचंद्र हे कोलकाता येथे नाटके लिहायचे. नझीर यांनी त्यांच्यासाठी नाटके लिहायला सुरुवात केली. ती सर्व हिट झाली. सरतचंद्र यांनी 40 व्या दशकाच्या उत्तरार्धात न्यू थिएटर कंपनीची निर्मिती केली. त्यांनी नझीर यांना त्यात काम करण्याची संधी दिली. नझीर नाटके लिहिण्यासोबत अभिनयही करत असत.
एके दिवशी बिमल रॉय नाटक पाहायला आले आणि त्यांना नझीरचे काम आवडले. नाझीर यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम केले होते. त्यामुळे बिमल रॉय यांनी बोस यांच्यावर ‘पहेला आदमी’ (1950) हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी कथा लेखनाची जबाबदारी नझीर यांच्याकडे सोपवली. अशा प्रकारे नझीर बिमल रॉय यांचा कायमचा सहाय्यक बनला. संवाद आणि पटकथा लिहिण्याबरोबरच त्यांनी बिमल रॉयच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात काम केले.
पहिला भोजपुरी चित्रपट बनवला
1960 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यात नाझीर हुसेन देखील अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. राजेंद्र प्रसाद हे बिहारचे होते आणि त्यांना माहीत होते की नझीर याचे भोजपुरी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यांनी संभाषणात भोजपुरी भाषेचा वापर केला. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी नाझीरसमोर ‘मन की बात’ ठेवली. राष्ट्रपती म्हणाले, ‘तुमची भोजपुरी चांगली आहे. पण, इथे भोजपुरीमध्ये चित्रपट का बनत नाहीत? या भाषेत चित्रपट बनले पाहिजेत. येथूनच नझीर हुसैन यांना त्यांचा पहिला भोजपुरी चित्रपट ‘गंगा मैया तोहे प्यारी चढाईबो’ (1963) बनवण्याची कल्पना सुचली. नझीर यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली. जेव्हा हा चित्रपट तयार झाला तेव्हा त्याचे प्रथम प्रदर्शन डॉ. राजेंद्र प्रसाद दाखवले होते.
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर नझीर हुसैन यांनी भोजपुरी चित्रपटातच काम करण्यास सुरुवात केली. 1979 मध्ये आलेल्या ‘बलम परदेसिया’ चित्रपटापासून त्यांनी चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. हा चित्रपट आजही भोजपुरी चित्रपटसृष्टीत एक बेंचमार्क मानला जातो. भोजपुरी चित्रपटांसोबतच ‘अमर अकबर अँथनी’, कटी पतंग, द बर्निंग ट्रेन, अस्ली नक्की या हिंदी चित्रपटांमध्येही नझीर यांच्या भूमिका दिसल्या. नझीर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास 500 चित्रपटांमध्ये काम केले. भोजपुरी सिनेमाचा पाया रचला. बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यांनी वडील, आजोबा आणि काकाच्या भूमिका केल्या. 500 चित्रपट देऊन आणि भोजपुरी चित्रपट सुरू करूनही मात्र त्यांना हवा तसा मान कधीच मिळाला नाही.
नझीर हुसेन यांचे त्याच्या गावातील हिफाजत नावाच्या मुलीशी लग्न केले. हैरुन्निसा ही मुलगी आणि एक मुलगा मुमताज आहे. नझीर आपल्या कुटुंबासह मुंबईतील मालाड परिसरात स्थायिक झाला. पण, गावाशी इतके जोडले गेले होते की चित्रपटांच्या शूटिंगसाठी ते अनेकदा गावी जात असत. आपल्या जुन्या मित्रांना भेटत. आजही त्यांचे जुने घर उसिया गावात आहे. 16 ऑक्टोबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे घरीच निधन झाले.