याला बोलतात सक्सेस! शाहरुखसोबत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीने मन्नत शेजारी घेतला ‘इतक्या ‘कोटींचा बंगला
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद हा देखील मिळाला. शाहरुख खान याने लगेचच त्याच्या आगामी चित्रपटांची शूटिंग सुरू केली.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह (Ranveer Singh) याचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत रणवीर सिंह याचे चित्रपट (Movie) फ्लाॅप जाताना दिसत आहेत. रोहित शेट्टी याला सर्कस चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे फक्त रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) हेच नाही तर संपूर्ण चित्रपटाची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसले. सर्कस चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या शोमध्येही प्रमोशन करण्यासाठी गेली होती.
एकीकडे रणवीर सिंह याचे चित्रपट सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत तर दुसरीकडे दीपिका पादुकोण हिचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान यांचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे यांच्या पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करत अनेक रेकाॅर्ड कमाईमध्ये तोडले.
आता एक मोठी बातमी पुढे आलीये. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे शाहरुख खान याचे शेजारी होणार आहेत. होय तुम्ही खरे ऐकले आहे. शाहरुख खान याचे शेजारी लवकरच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह होणार आहेत. शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्याच्या शेजारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना त्यांचे आलिशान घर मिळाले आहे.
मन्नत बंगल्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी घर खरेदी केल्याची चर्चा तूफान रंगताना दिसत आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी लग्झरी अपार्टमेंटमध्ये हे घर घेतले आहे. मात्र, याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, जेंव्हापासून हे कळाले आहे की, दीपिका आणि रणबीर हे शाहरुख खान याचे शेजारी होणार तेंव्हापासून चाहत्यांमध्ये उत्साह हा बघायला मिळतोय.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मैत्री ही अत्यंत खास आहे. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी पठाण चित्रपटाच्या अगोदर चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात सोबत काम केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या त्या चित्रपटाने देखील कमाईमध्ये मोठा धमाका केला होता. पठाण चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील खूप प्रेम मिळाले. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरलाय.