Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन आणि ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा, ‘बिग बी’च्या घरी मोठे खलबतं, निमंत्रण स्वीकारत थेट मुंबईत

| Updated on: Aug 28, 2023 | 11:07 PM

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे अभिनेते आहे. अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही देखील कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा, बिग बीच्या घरी मोठे खलबतं, निमंत्रण स्वीकारत थेट मुंबईत
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसतात. अनेकदा काही खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर केल्याने अमिताभ बच्चन चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा उंचाई हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका केला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रेम देखील दिसले.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत या चित्रपटात अनुपम खेर हे मुख्य भूमिकेत होते. उंचाई हा चित्रपट चार मित्रांच्या सुंदर मैत्रीवर आधारीत आहे. इतकेच नाही तर एखाद्या व्यक्तीने जर एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर त्याला वयाचा काहीच फरक पडत नाही, असे उंचाई चित्रपटात दाखवण्यात आले. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.

अमिताभ बच्चन यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. नुकताच अमिताभ बच्चन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना आपल्या घरी चहासाठी बोलावले आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी दिलेले हा निमंत्रण ममता बनर्जी यांनी देखील स्वीकारले. अमिताभ बच्चन आणि ममता बनर्जी यांचे गेल्या काही वर्षांपासून अत्यंत चांगले संबंध असल्याने त्यांनी लगेचच अमिताभ बच्चन यांचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे ममता बनर्जी या 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबईत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईमध्ये भारत विरोधी आघाडीची तिसरी बैठक होणार आहे आणि याच बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ममता बनर्जी मुंबईत येणार आहेत. ममता बनर्जी या 30 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांच्या घरी जाणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. गेल्याच वर्षी बिग बी हे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला पोहचले होते.

यावेळी ममता बनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये चक्क एका चाहत्याच्या गाडीवर फिरताना अमिताभ बच्चन हे दिसले. याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले. अमिताभ बच्चन यांनी यादरम्यान गाडीवर फिरताना हेल्मेट घातले नसल्याने मुंबई पोलिसांनी अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करत त्यांना दंड आकारला. याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत असतानाच अमिताभ बच्चन यांनी मुंबई पोलिसांच्या गाडीसमोरचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.