‘भाजपशिवाय देशाकडे दुसरा पर्याय नाही…’, लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचं भाकीत ठरणार खरं?

Nana Patekar : 'नरेंद्र मोदीच पुढचे पंतप्रधान, कारण...', लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचं भाकीत ठरणार खरं? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा... राजकारणाबद्दल नाना पाटेकर कायम स्पष्ट मत मांडताना दिसतात.

'भाजपशिवाय देशाकडे दुसरा पर्याय नाही...', लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांचं भाकीत ठरणार खरं?
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 12:41 PM

मुंबई | 25 डिसेंबर 2023 : सुपरस्टार आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत नाना पाटेकर यांनी चाहत्यांच्या मनावर आणि इंडस्ट्रीवर राज्य केलं. फक्त सिनेमेच नाही तर, नाना पाटेकर त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात. आता देखील नाना पाटेकर यांनी भाजप पक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेलं भाकीत खंर ठरणार का? हे पाहाणं देखील महत्वाचं ठरणार आहे..

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी राजकारणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ असा प्रश्न नाना पाटेकर यांना विचारण्यात आला. यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही…’ सध्या नाना पाटेकर यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.

‘आगामी निवडणुकीत भाजपला 350-375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील.. देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही.’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांनी केलेलं भाकीत चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

नाना पाटेकर यांचे सिनेमे

नाना पाटेकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नुकताच नाना पाटेकर ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. नाना पाटेकर यांचे अनेक सिनेमे आजही चाहते तितक्याच आवडीने पाहातात. नाना पाटेकर यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये नाना पाटेकर एका मुलाला मारताना दिसले. पण टीका होऊ लागल्यानंतर खुद्द नाना पाटेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आणि सिनेमातील एक सीनचं शूटिंग सुरु असताना घटना घडली असं सांगितलं.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.