Jaya Prada यांना कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा; खरं कारण जाणून व्हाल थक्क
अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिने तुरुंगात खडी फोडावी लागणार?, कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा; काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया प्रदा यांची चर्चा
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. चेन्नई न्यायालयाने जया प्रदा यांना सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एवढंच नाही तर त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. थिएटरमध्ये काम करणाऱ्य कर्मचाऱ्यांना ईएसआयचे पैसे न दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी राम कुमार आणि राजा बाबू यांना देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. जया प्रदा यांचं चेन्नई याठिकाणी एक थिएटर होतं. पण त्यांचं थिएटर आता बंद झालं आहे. थिएटर बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जया प्रदा याच्या विरोधात आवज उठवला.
थिएटर कर्मचारी म्हणाले, जया प्रदा यांनी मानधनात कपात केली आणि ईएसआईचे पैसे दिलेच नाही.. ज्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ईएसआयचे पैसे सरकारी विमा महामंडळाला दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लेबर गव्हर्नमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ ने चेन्नई येथील एग्मोर मॅजिस्ट्रेट कोर्टात जया प्रदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला. ज्यामुळे जया प्रदा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जया प्रदा यांनी आरोप मान्य करत, खटला रद्दल करण्याची विनंती केली आहे.
संबंधीत प्रकरण कोर्टात गेल्यानंतर थकलेली रक्कम परत देण्याचे आश्वासनही जया प्रदा यांनी दिलं, पण न्यायालयाने जया प्रदा यांची मागणी फेटाळत दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या सर्वत्र जया प्रदा यांची चर्चा सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सध्या जया प्रदा अडचणीत सापडल्या आहेत, पण एक काळ असा होता, जेव्हा जया प्रदा यांनी बॉलिवूडवर राज्या केलं होतं. फार लहान असताना जया प्रदा यांना दाक्षिणात्या सिनेविश्वातून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर जया प्रदा यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
जया प्रदा यांनी ‘सरगम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कामचोर, तोहफा, शराबी, मकसद, संजोग, आखिरी रास्ता, एलान-ए-जंग, आज का अर्जुन, थानेदार, मां यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.