Anil Kapoor | अनिल कपूर यांचा फोटो आणि डायलाॅग वापरणे पडू शकते महागात, थेट दिल्ली उच्च न्यायालयाने
अनिल कपूर हे कायमच चर्चेत असतात. अनिल कपूर यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. अनिल कपूर यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळतेय. अनिल कपूर हे सोशल मीडियावर सक्रिय असतात.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनिल कपूर यांची एक वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना अनिल कपूर हे दिसले. अनिल कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. अनिल कपूर हे सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतात. अनिल कपूर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट भूमिका या नक्कीच केल्या आहेत.
नुकताच आता अनिल कपूर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अत्यंत मोठा दिलासा दिलाय. अनिल कपूर यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अनिल कपूर यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालय एक याचिका दाखल केली. आज त्याच याचिकेवर सुनावणी करण्यात आली. यानंतर मोठी चर्चा रंगलीये.
अनिल कपूर यांनी दाखल केलेली पर्सनॅलिटी राइट्स याचिकेवर न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. झकास, नाव, फोटो, आवाज आणि निक नेम AK, डायलाॅग हे आता अनिल कपूर यांच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकणार नाहीये. यावर न्यायालयाकडून बंदी घालण्यात आलीये. जर कोणाला अनिल कपूर यांचा फोटो, नाव निक नेम वापरायचे असेल तर त्यांची परवानगी लागणार आहे.
अनिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार लोक त्यांचा फोटो, नाव, डाॅयलाॅग हे सर्व लोकांकडून पैसे घेण्यासाठी वापरत आहेत, जे चुकीचे आहे. याच याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीमध्ये महत्वाचा निर्णय दिला आहे. यामुळे आता अनिल कपूर यांचा फोटो आणि नाव वापरताना लोकांना विचार करावा लागणार आहे.
अनिल कपूर हे कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसतात. 64 व्या वयातही अनिल कपूर यांचा जबरदस्त असा फिटनेस नक्कीच बघायला मिळतोय. चंद्रयानने यशस्वी लॅडिंग केल्यानंतर अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अनिल कपूर हे गॅलरीमध्ये बसून चंद्रयानची लॅडिंग बघताना दिसले. इतकेच नाही तर जल्लोष करतानाही अनिल कपूर हे दिसले.