आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम, माहितीपटाचे खास स्क्रिनिंगही…

आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामचा धमाका हा बघायला मिळणार आहे. स्पेशल स्क्रिनिंगही चित्रपटाचे ठेवण्यात आले आहे. मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे.

आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम, माहितीपटाचे खास स्क्रिनिंगही...
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 2:29 PM

मुंबई : निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. खरोखरच ही एक अत्यंत मोठी अशी बाब नक्कीच आहे. या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा सर्व माहितीपट असणार आहे.

यानिमित्त्यानेच मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या `मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ या नाट्य माहितीपटाची निर्मिती करण्यात आलीये. सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून ही निर्मिती करण्यात आलीये.

प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा या मराठी कलाकारांनी यामध्ये कलाकारांची भूमिका या माहितीपटात धमाकेदार पद्धतीने नक्कीच साकारली आहे.

सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांचा संदर्भ घेत माहितीपटाची संहिता लिहीण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथमच येत आहे, ही मोठी बाब नक्कीच आहे.

या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वास डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला आहे. 13 जानेवारी 2024 रोजी मुंबईतील माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. हा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे. आता याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.