The Family Man 2 मुळे ज्यांची सर्वाधिक नेटवर चर्चा आहे ते चेल्लाम सर नेमके कोण आहेत?

'द फॅमिली मॅन 2'मध्ये (The Family Man 2) आणखी एक पात्र सर्वात जास्त चर्चेत आहे. हे पात्र ‘चेल्लाम’ सरांचे आहे. #ChellamSir सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. त्यांची तुलना गुगल, विकिपीडिया आणि विश्वकोशांशी केली जात आहे,

The Family Man 2 मुळे ज्यांची सर्वाधिक नेटवर चर्चा आहे ते चेल्लाम सर नेमके कोण आहेत?
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 9:11 AM

मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनीची (Samantha) वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ (The Family Man 2) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तमिळ भाषिक भागात या शोला अजूनही विरोध सुरू असला, तरी सर्व वादाच्या पार्श्वभूमीवरही हा वेब शो सुपरहिट असल्याचे सिद्ध झाले आहे. मनोज बाजपेयी सोबतच समंथाच्या अभिनयाचीही खूप प्रशंसा केली जात आहे. पण या सर्वांमध्ये आणखी एक पात्र सर्वात जास्त चर्चेत आहे. हे पात्र ‘चेल्लाम’ सरांचे आहे. #ChellamSir सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. त्यांची तुलना गुगल, विकिपीडिया आणि विश्वकोशांशी केली जात आहे (The Family Man 2 Know who is Chellam Sir AKA actor Uday Mahesh).

नेटकरी म्हणत आहेत की, ‘चेल्लाम सर’ यांच्याकडे प्रत्येक कठीण प्रश्नाचे उत्तर आहे. खरं सांगायचं तर, ‘द फॅमिली मॅन 2’ या शोचे खरे हिरो ठरले ‘चेल्लाम सर’. चला तर, खऱ्या आयुष्यातीला हे ‘चेल्लाम सर’ म्हणजेच उदय महेश (Uday Mahesh) कोण आहेत, हे जाणून घेऊया…

‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये ‘चेल्लाम सरां’ची भूमिका नेमकी काय?

चेल्लाम सरांची व्यक्तिरेखा साकारणार्‍या अभिनेता उदय महेश यांच्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण ‘चेल्लाम सरां’ची नेमकी भूमिका काय, हे जाणून घेऊया…’द फॅमिली मॅन 2′ ची कथा भारताभोवती फिरते आहे. देशाच्या पंतप्रधान श्रीमती बासु आणि या सर्वांच्या मधे श्रीलंकेच्या एका बंडखोरांचा गट आहे. या गटाचे काही लोक चेन्नईमध्येही आहेत. समंथा अक्किनेनी या गटाची सदस्य आहे. तिच्या निशाण्यावर भारताच्या पंतप्रधान आहेत आणि श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज बाजपेयी आणि त्यांच्या टीमवर हा हल्ला थांबवण्याची जबाबदारी आहे.

शोमध्ये जिथे श्रीकांत तिवारीला काहीच सुचत नाही, तिथे चेल्लाम सरांची एंट्री होते. ते एक माजी गुप्तहेर आहेत. बंडखोरांपासून ते सरकारी खात्यापर्यंतच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे चेल्लाम सरांकडे सापडतात. तर जिथे जिथे श्रीकांत तिवारीचे पात्र गोंधळते, तिथे ते चेल्लाम सरांना फोन करतात (The Family Man 2 Know who is Chellam Sir AKA actor Uday Mahesh).

अवघ्या 15 मिनिटांत भाव खाऊन गेलेली भूमिका

‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये एकूण 9 भाग आहेत. प्रत्येक भागाची लांबी सुमारे 1 तास आहे आणि या सर्वांमध्ये चेल्लाम सरांची भूमिका केवळ 15 मिनिटांची आहे. चेल्लाम सरांची स्वतःची एक खास शैली आहे. ते अतिशय सावध असतात. बर्‍याच प्रसंगी असे दिसते आहे की, मनोज बाजपेयी ज्या सरकारी संस्थेसाठी काम करतात त्या टीएएससीच्या एक पाऊल पुढे चेल्लाम सर आहेत. बंडखोर पुढे काय करणार आहेत, त्यांनी आधी काय केले आहे, ते कुठे भेटतील, याची सर्व माहिती चेल्लाम सरांकडे आहे. त्यांच्याजवळ डझनभर मोबाईल असतात. प्रत्येक कॉल नंतर ते नवीन सिम वापरतात.

कोण आहेत उदय महेश?

उदय महेश हे दक्षिण भारतीय चित्रपट आणि टीव्हीचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. उदयभानु महेश्वरन असे त्याचे पूर्ण नाव आहे. 21 फेब्रुवारी 1970 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या उदय महेश यांनी आतापर्यंत दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट ‘नालई’ 2006मध्ये प्रदर्शित झाला होता. 2008मध्ये ‘चक्करा वियुगम’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता म्हणून उदय महेश यांना टीव्ही शो ‘ऑफिस’ मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. ते एका आयटी कंपनीचे कंट्री हेड विश्वनाथनच्या भूमिकेत होते.

अभिनेता म्हणून त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शो केले आहेत. जॉन अब्राहमचा ‘मद्रास कॅफे’, रजनीकांत यांचा ‘कबाली’, अजीतसोबत Nerkonda Paarvai आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सिरिअस मॅन’ या चित्रपटांमध्ये देखील ते झळकले आहेत.

(The Family Man 2 Know who is Chellam Sir AKA actor Uday Mahesh)

हेही वाचा :

Top 5 Marathi Serial | मालिकांच्या शर्यतीत ‘देवमाणूस’ची एंट्री, पाहा या आठवड्याच्या अव्वल मालिका

Nisha-Karan Mehra | करण-निशाच्या वादानंतर सोशल मीडियावर चर्चेत आलाय ‘हा’ बेडरूम व्हिडीओ ! 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.