The Family Man season 3: ‘द फॅमिली मॅन 3’ बाबतची मोठी अपडेट आली समोर
मनोज बाजपेयीच्या 'द फॅमिली मॅन 3' या वेबसिरीजबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या वेब सीरीजचे दोन्ही भाग खूपच हिट ठरले. आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची प्रतिक्षा आहे. द फॅमिली मॅन 3 च्या निर्मात्यांनी वेब सीरीजबाबत चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे.
The Family Man season 3 : मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन 3’ या वेबसिरीजच्या दोन्ही सीजने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीझनची प्रतिक्षा आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून त्याची वाट पाहत आहेत. सीझन 3 ची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ‘द फॅमिली मॅन 3’ बाबत आता नवी अपडेट पुढे आली आहे. ज्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे. द फॅमिली मॅन ही अभिनेता मनोज बाजपेयीची डेब्यू वेब सीरीज आहे. पहिल्याच वेब सीरीजमध्ये त्याने धमाकेदार यश मिळवले. श्रीकांत तिवारीच्या व्यक्तिरेखेने खूप चर्चा मिळवली. या वेब सीरीजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. आता तिसरा सीजन ही सुपरहीट ठरेल अशी निर्मात्यांना आशा आहे.
द फॅमिली मॅन 3 मध्ये, मनोज बाजपेयी पुन्हा एकदा मध्यमवर्गीय व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. पण तो आता जागतिक दर्जाचा जासूस असणार आहे. चाहत्यांच्या प्रतिक्षा वाढली असतानाच आता निर्मात्यांनी मालिकेच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू केले आहे. OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime ने लीड मनोज बाजपेयी सोबत टीम फोटो शेअर करून The Family Man 3 चे अपडेट शेअर केले आहे.
द फॅमिली मॅन 3 चे शूटिंग सुरू
द फॅमिली मॅन 3 च्या शूटिंगची घोषणा करताना प्राइम व्हिडिओने दोन फोटो शेअर केले आहेत. द फॅमिली मॅन 3 चा बोर्ड पहिल्या फोटोत दिसत आहे. दुसऱ्या फोटोत मनोज बाजपेयी, सुमन कुमार आणि राज आणि डीके यांची जोडी कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे.
लोकप्रिय चेहरे पुन्हा पाहायला मिळणार
द फॅमिली मॅन 3 ची निर्मिती राज आणि डीके यांनी केली आहे. या हिट जोडीने या मालिकेचे दिग्दर्शनही केले आहे. त्याच वेळी सुमन कुमार आणि राज आणि डीके यांनी मिळून द फॅमिली मॅन 3 ची कथा लिहिली आहे. मालिकेच्या तिसऱ्या भागात काही जुने चेहरे पुन्हा एकदा दिसणार आहेत. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त प्रियामणी (सुचित्रा तिवारी), शरीब हाश्मी (जेके तळपदे), अश्लेषा ठाकूर (धृती तिवारी) आणि वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी) या नावांचा समावेश आहे. याशिवाय काही नवीन नावांचाही स्टारकास्टमध्ये समावेश होणार आहे.