Munawar Faruqui: ‘वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये का घा** केली जाते?’; मुनव्वर फारुकीच्या ट्विटवर भडकले ‘द फॅमिली मॅन’चे लेखक

जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या आजाराविषयी सांगितलं होतं. त्यानंतर मुनवरने त्याची खिल्ली उडवली. यामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा मुनव्वरने ट्विट केलं असून त्यावर द फॅमिली मॅन (The Family Man) या वेब सीरिजच्या (Web Series) लेखकाने प्रतिक्रिया दिली आहे.

Munawar Faruqui: 'वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये का घा** केली जाते?'; मुनव्वर फारुकीच्या ट्विटवर भडकले 'द फॅमिली मॅन'चे लेखक
Munawar Faruqui and Manoj BajpayeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 3:19 PM

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) अनेकदा चर्चेत असतो. ‘लॉक अप’ हा रिॲलिटी शो जिंकल्यानंतर त्याचा फॅन फॉलोइंग आणखीनच वाढला. मुनव्वर काही म्युझिक व्हिडिओमध्येही झळकला. पण अनेकदा तो असं काही करतो जे लोकांना अजिबात आवडत नाही. जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरने काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्या आजाराविषयी सांगितलं होतं. त्यानंतर मुनवरने त्याची खिल्ली उडवली. यामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा मुनव्वरने ट्विट केलं असून त्यावर द फॅमिली मॅन (The Family Man) या वेब सीरिजच्या (Web Series) लेखकाने प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझन्सबद्दल ट्विट करताना मुनव्वरने आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर ‘द फॅमिली मॅन’चे लेखक सुमन कुमार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी लिहिलं, ‘Excuse me?’ या ट्विट्सवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. एकाने लिहिल, ‘इथे बरेच सेकंड सिझन आहेत जे सिझन 1 पेक्षा चांगले आणि दमदार आहेत.’ तर दुसऱ्याने लिहिलं, ‘मिर्झापूर आणि पंचायत या वेब सीरिजचे दुसरे सिझनही खूप चांगले आहेत.’ तर काहींनी मुनव्वरच्या ट्विटवर प्रतिक्रिया देऊन त्याला उगाच अधिक महत्त्व दिल्याचं सुमन यांना म्हटलं.

हे सुद्धा वाचा

पहा ट्विट-

लॉक अप हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर खतरों के खिलाडी 12 या शोमध्ये सहभागी होणार होता. पण आता तो या शोचा भाग होऊ शकणार नसल्याचं त्याने सोशल मीडियाच्याद्वारे सांगितलं. ‘मित्रांनो, काही कारणांमुळे मी KKK 12 चा भाग बनू शकणार नाही. मी तुमची माफी मागतो. माझी खूप इच्छा होती पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य आहे. तुम्हा सर्वांची निराशा झाली असेल पण मलाही जाता येत नाही याचं वाईट वाटतंय,’ असं तो म्हणाला.

कोण आहे मुनव्वर फारुकी?

मुनव्वर हा इंदौरमधील स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याने हिंदुंच्या भावना दुखावल्याचं म्हणत जेव्हा हिंदू संघटनांनी बेंगळुरूमधील त्याचा कार्यक्रम रद्द करायला भाग पाडलं, तेव्हापासून तो अधिक प्रकाशझोतात आला. या दोन महिन्यांच्या काळात त्याचे जवळपास 12 शोज रद्द झाले होते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.