जेव्हा धोक्यात होते The Kapil Sharma Show फेम अभिनेत्याचे प्राण, आईच्या विश्वासाने झाला चमत्कार, त्यानंतर…

The Kapil Sharma Show | 'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्याची प्रकृती होती चिंताजनक, पण तेव्हा आईने घेतलेल्या निर्णयानंतर झाला चमत्कार... सध्या सर्वत्र अभिनेत्याने सांगितलेल्या प्रसंगाची चर्चा... अभिनेत्याला असं झालं तरी काय होतं. आईने घेतलेला निर्मय ठरला लाभदायक...

जेव्हा धोक्यात होते The Kapil Sharma Show फेम अभिनेत्याचे प्राण, आईच्या विश्वासाने झाला चमत्कार, त्यानंतर...
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 1:58 PM

मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. आपल्या कानावर असे अनेक किस्से समोर येत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं पार कठीण असतं. सेलिब्रिटी देखील त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता ‘द कपिल शर्मा शो’ मधील एका प्रसिद्ध अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कलाकार त्यांच्या विनोदबुद्धीने चाहत्यांना हासवत असतात. पण त्यांच्या आयुष्यात देखील अशा अनेक अडचणी येतात, ज्यामुळे सेलिब्रिटी देखील पूर्णपणे खचतात. सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता अली असगर आहे.

सर्वांना कायम पोट धरुन हासवणार अली सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एकवेळ अशी आली होती, जेव्हा अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक होती. सोशल मीडियावर अली याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने सांगितलं फक्त आईच्या विश्वासामुळे माझी सर्जरी झाला नाही. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

अली असगर याला काय झालं होतं?

अली म्हणाला, ‘माझी प्रकृती चिंताजनक होती, तेव्हा डॉक्टरांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. माझ्या आरोग्याबाबत समस्या ऐकून माझी आई बेशुद्ध पडली. रुग्णालयातून आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा आई म्हणाली,’मी तुला सर्जरी करण्याची परवानगी देणार नाही. तुला काही झालं तरी चालेल पण मी सर्जरी होवू देणार नाही..’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा मी म्हणालो, सर्जरी नाही तर, काय करायचं आपण? तेव्हा आई म्हणाली, ‘तुला आणखी मोठ्या सर्जनकडे घेवून जाईल…’ माझ्या घरी एक मिंबर (देवाचं स्थान) आहे. आईने प्रार्थना केली. आज त्या गोष्टीला २२ वर्ष झाली आहे. विज्ञान एका बाजूला आणि आणि विश्वास एका बाजूला… तेव्हा फक्त आईच्या विश्वासामुळे चमत्कार झाला आणि प्राण वाचले…’ असं अभिनेता म्हणाला.

अली असगर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. अनेक मलिका आणि सिनेमांच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस आला. अनेत प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्याने स्क्रिन शेअर केली आहे. एवढंच नाही तर, अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.