The Kapil Sharma Show फेम अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर, आई – वडिलांना गमावलं
The Kapil Sharma Show फेम अभिनेत्याने गमावलं आई - वडिलांना.. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...; अभिनेत्यवर दुःखाचा डोंगर... सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा... चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली...
मुंबई : 24 सप्टेंबर 2023 | ‘द कपिल शर्मा शो ‘ (The Kapil Sharma Show) मधील कलाकार कायम त्यांच्या विनोदबुद्धीने चाहत्यांना पोट धरुन हासण्यास भाग पाडतात. एखादा निराश चाहता देखील कालाकारांच्या विनोदाने आनंदी होतो. पण आता सर्वांना हासवणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’ मधील एका अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने दोन महिन्यांमध्ये आई – वडिलांना गमावलं आहे. आई – वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मधील अभिनेता किकू शारदा याने आई – वडिलांना गमावलं आहे…
काही तासांपूर्वी किकू याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता आई – वडिलांचा फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘गेल्या दोन महिन्यांमध्ये मी दोघांना देखील गमावलं आहे. आई.. बाबा… तुमची खूप आठवण येतेय… तुमच्या शिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार देखील करु शकत नाही…’ असं अभिनेता पोस्टमध्ये म्हणाला आहे…
View this post on Instagram
‘माझ्या टीव्ही शोबद्दल मला आता फिडबॅक कोण देईल.. मी चुकीचं करत आहे, की वाईट करत आहे… याबद्दल मला आता कोण सांगेल.. माझ्या यशावर आता आनंदी कोण होईल… माझ्या प्रत्येक सेटबॅकवर आता दुःखी कोणी होईल. केबीसीचे एपिसोड पाहिल्यानंतर मला फोन कोण करेल… अमिताभ बच्चन यांनी काय मजेदार केलं… कोण सांगेल… मला तुमच्याकडून आणकी बरंच काही ऐकायचं होतं बाबा… तुम्हाला खूप काही सांगायचं होतं…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘बाबा… तुम्हाला कायम ठाम राहताना पाहिलं. तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. आयुष्य तुम्ही जगत होतात… तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी अनेक योजना आखल्या होत्या… खूप काही शिकलो आहे तुमच्याकडून… खूप काही शिकायचं होतं. तुम्ही दोघांनी प्रचंड घाई केली.. तुम्ही कायम एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलं आणि तुम्ही एकत्र आहात… मला तुमची आठवण येत आहे आई – बाबा…’ असं अभिनेता भावना व्यक्त करत म्हणाला…
अभिनेत्याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याच्या आई – वडिलांना सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली…