‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट नाही, विवेक अग्निहोत्री यांचा दावा खोटा?
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे सांगितले जातंय.
मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑस्कर 2023 (Oscars 2023) पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलाय, असा दावा विवेक अग्निहोत्री यांनी केला. यानंतर सर्वच स्तरातून विवेक अग्निहोत्री यांचे काैतुक केले जात होते. विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली. मात्र, विवेक अग्निहोत्री ‘(Vivek Agnihotri) यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचे सांगितले जातंय. कारण ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी अजून कोणताच चित्रपट शॉर्टलिस्ट करण्यात आला नाहीये. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट अजूनही पुरस्काराच्या रेसमध्ये नक्कीच आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी आज ट्विट करत ही आनंदाची बातमी सांगितली होती. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, आतातर ही सुरूवात आहे…अजून खूप पुढे जायचे आहे…पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला होता.
BIG ANNOUNCEMENT: #TheKashmirFiles has been shortlisted for #Oscars2023 in the first list of @TheAcademy. It’s one of the 5 films from India. I wish all of them very best. A great year for Indian cinema. ???
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 10, 2023
पुढे विवेक अग्निहोत्रीने म्हटले की, द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिल्या यादीमध्ये ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालाय. हा भारतामधील पाच चित्रपटांपैकी एक आहे. मी सर्वांचेच अभिनंदन करतो.
जर आपण पुरस्काराची अधिकृत वेबसाइट पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, विवेक अग्निहोत्री यांचा दावा खोटा आहे. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट शॉर्टलिस्ट झाला नाहीये. भारतामधील आतापर्यंत एकच चित्रपट हा ऑस्करसाठी International Feature Film कॅटेगिरीमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे.
याशिवाय भारतामधील दुसरा कोणताच चित्रपट अजूनही शॉर्टलिस्ट झाला नसल्याचे हे या बेवसाईटवरून स्पष्ट होत आहे. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.
हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, बाॅक्स आॅफिसवर या चित्रपटाने मोठा धमाका केला. जगभरातून या चित्रपटाने 341 कोटींची कमाई केलीये. विशेष म्हणजे अत्यंत कमी बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता.