The Kerala Story सिनेमाचा दबदबा कायम; विरोध – बहिष्कारानंतरही बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई

सतत विरोध होत असताना देखील ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात गर्दी... सिनेमाने पाच दिवसांत कमावले इतके कोटी... कमाईचा आकडा थक्क करणारा...

The Kerala Story सिनेमाचा दबदबा कायम; विरोध - बहिष्कारानंतरही  बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 10:29 AM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यांनी बंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण होणाऱ्या वादाचा कोणताही परिणाम सिनेमावर झाला नाही. आजही अनेक ठिकाणी सिनेमाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. पण तरी देखील बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करताना दिसत आहे.

सिनेमाचा आकडा थक्क करणारा आहे. बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा दबदबा दिसून येत आहे. सिनेमा देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, काही ठिकाणी तर सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. पण काही ठिकाणी सिनेमा बॅन करण्यात आला आहे. असं असताना देखील सिनेमाने पाच दिवसांत ५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने ८ कोटींची कमाई केली. सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण ३५ कोटींची कमाई केली. सोमवारी सिनेमाने तब्बल जवळपास ११ कोटींची कमाई केली, ज्यामुळे सिनेमाचं कलेक्शन ४६ कोटी रुपयांवर पोहोचलं. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने रिलीजच्या पाचव्या दिवशी ११ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे सिनेमा ५ दिवसात ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

आता ‘द केरळ स्टोरी’ १०० कोटी रुपयांपर्यंत कधी पोहोचतो यावर निर्मात्यांचं लक्ष आहे. दिग्दर्शक सुदिप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. सिनेमात अदाह शर्मा (Adah Sharma), योगिता बिहानी (Yogita Bihani), सोनिया बलानी (Sonia Balani) आणि सिद्धी इदनानी (Siddhi Idnani) मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.