अदा शर्मा गंभीर आजाराच्या विळख्यात, न थांबणारी मासिक पाळी, सलग 48 दिवस रक्तस्त्राव
Adah Sharma : फिजिकल ट्रांसफॉर्मेशन अदा शर्मा हिला पडलं महागात... अभिनेत्री गंभीर आजाराच्या विळख्यात; म्हणाली, 'न थांबणारी मासिक पाळी, सलग 48 दिवस रक्तस्त्राव...', काय आहे 'त्या' आजाराचं नाव? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या प्रकृतीची चर्चा...
‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. नुकताच अदा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या घरात शिफ्ट झाली आहे. पण सध्या अदा तिच्या कोणत्या सिनेमामुळे किंवा अन्य कारणामुळे नाहीतर, प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे. अदा एका गंभीर आजाराच्या विळख्यात सापडली आहे. फिजिकल ट्रांसफॉर्मेशनमुळे अदा शर्मा हिला गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. एंडोमेट्रियोसिस नावाच्या आजारेने अभिनेत्री त्रासली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली, ‘वेगवेगळ्या सिनेमांसाठी मला वेगवेगळ्या फिगरची गरज होती. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या पहिल्या भागासाठी मला पातळ व्हायचं होतं. कारण मी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीसारखी दिसेल. ‘कमांडो’ सिनेमासाठी मला मजबूत व्हायचे होते. तर सनफ्लावरट’साठी मला सेक्सी दिसायचं होतं. कारण त्यामध्ये मी एक बार डान्सर आहे…
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘बस्तर सिनेमासाठी मला स्वतःचं मोठ्या प्रमाणात वजन वाढवावं लागलं. एका दिवसात मी जवळपास 10 ते 12 केळी खाल्ली कारण वजन वाढेल. वजन वाढत होतं, पण त्यासोबत अनेक समस्या देखील समोर येत होत्या.’
‘सिनेमात आमच्या खऱ्या बंदूका होत्या. त्यांचं वजन आठ किलो होतं. तेव्हा मेवा, सुका मेवा आणि अंबाडीच्या बियांचे बरेच लाडू… नेहमी माझ्याजवळ ठेवते आणि झोपण्याच्या अर्धा तास आधी त्यापैकी दोन खाते.’ ‘बस्तर’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेत्रीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अभिनेत्री एंडोमेट्रियोसिसचा त्रास होऊ लागला. एंडोमेट्रियोसिस एका असा अजार आहे, ज्यामध्ये मासिक पाळी थांबत नाही. अदा शर्मा म्हणाली, सलग 48 दिवस अभिनेत्रीला रक्तस्त्राव होत राहिला… अदा शर्मा कायम स्वतःबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अदा शर्मा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अदा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.