Adah Sharma | ‘बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना सेटवर बोलावलं जातं, त्यानंतर…’, इंडस्ट्रीमधील लिंगभेदावर असं का म्हणाली अदा शर्मा?

'इंडस्ट्रीमध्ये चांगल्या - वाईट स्वभावाची माणसं आहेत, पण अभिनेत्रींसोबत....', बॉलिवूडबद्दल 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मा हिचं धक्कादायक वक्तव्य...

Adah Sharma | 'बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना सेटवर बोलावलं जातं, त्यानंतर...', इंडस्ट्रीमधील लिंगभेदावर असं का म्हणाली अदा शर्मा?
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 2:40 PM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा हिची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. सिनेमात अदाने साकारलेली भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या वादग्रस्त सिनेमात आदाने शालिनी उन्नीकृष्णन यांची मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीने यापूर्वी टीव्ही तसेच हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये देखील काम केले आहे. सध्या अभिनेत्री ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.. प्रत्येक मुलाखतीत अदा करियरमध्ये तिला आलेले अनुभव सांगत आहे… आता बॉलिवूडमध्ये महिला, पुरुष यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिची चर्चा आहे….

झगमगत्या विश्वात आलेल्या अनुभवाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी उत्तर आणि दक्षिणेतील लोकांसोबत काम केलं आहे. दोन्ही ठिकाणी अद्भुत लोक होते आणि काही अतिशय आश्चर्यकारक देखील होते. माझ्या लक्षात आलं, की जर तुमच्याकडे चांगला दिग्दर्शक असेल तर तुमची भाषा कोणतीही असो, सर्व काही उत्तम असतं. पण जर तुमच्या दिग्दर्शकाचा स्वभाव चांगला नसेल, तर काम करण्यासाठी आनंद वाटत नाही..’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी प्रत्येक ठिकाणी चांगल्या – वाईट स्वभावाच्या माणसांना भेटली आहे… पण बॉलिवूडमध्ये एक वेगळी गोष्ट अनुभवली.. बॉलिवूडमध्ये अभिनेता – अभिनेत्री यांना समान मानधन मिळावं यासाठी चर्चा करण्याआधी लिंगभेदावर तोडगा काढायला हवा.. बॉलिवूडमध्ये सर्वात आधी अभिनेत्रीला सेटवर बोलावतात.. त्यानंतर थांबायला लावतात…’

हे सुद्धा वाचा

‘अभिनेत्री सेटवर बसलेली असते.. त्यानंतर सर्वकाही व्यवस्थित आहे की नाही पाहिलं जातं.. त्यानंतर अभिनेत्रीच्या मॅनेजरला बोलावण्यात येतं.. त्यानंतर अभिनेत्याला सेटवर येण्यास सांगितलं जातं… मला बॉलिवूडमध्ये लिंगाच्या आधारावर भेदभाव वाटतो. अशा वातावरणात काम करताना मला आनंद वाटत नाही.’ असं देखील अभिनेत्री अदा शर्मा बॉलिवूडबद्दल म्हणाली..

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा भारतात ५ मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा लव्ह जिहाद, धर्मांतर आणि दहशतवादी संघटना ISIS वर आधारलेला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. सिनेमाने २०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. सिनेमाने आतापर्यंत २१६.०७ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा २०२३ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.