Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adah Sharma | ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माची मराठी कविता व्हायरल; नेटकरी फिदा

'आजकाल मराठी कलाकारांना मराठीत बोलायची लाज वाटते, पण तुम्हाला बघून अभिमान वाटतो', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. काहींनी अदा शर्माकडे मराठी चित्रपटात काम करण्याचीही विनंती केली आहे.

Adah Sharma | 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माची मराठी कविता व्हायरल; नेटकरी फिदा
अदा शर्मा
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 12:48 PM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटात तिने शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका अत्यंत उत्तमरित्या साकारली आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना कशा पद्धतीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर केलं जातं, त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत कसं सामील करून घेतलं जातं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 180 हून अधिक कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मुख्य अभिनेत्री अदा शर्माबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती मराठीत एक कविता बोलताना दिसत आहे.

या व्हिडीओत अदा शर्मा इडली खाताना दिसत आहे. ती फक्त इडली खातच नाहीये तर लहानपणीची प्रसिद्ध कविता ती यामध्ये बोलून दाखवतेय. ‘एक होती इडली, ती होती चिडली. धावत धावत आली, सांबारात बुडाली. सांबार होते गरम गरम, इडली झाली नरम नरम. चमचा आला खुशीत, जाऊन बसला बशीत. चमच्याने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे. इडली होती फारच मस्त, मी सगळी केली फस्त,’ हे बडबडगीत ती म्हणते.

हे सुद्धा वाचा

अदा शर्माचा हा मराठी अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खूप छान मराठी बोलता तुम्ही’ असं एकाने लिहिलं आहे. तर ‘आजकाल मराठी कलाकारांना मराठीत बोलायची लाज वाटते, पण तुम्हाला बघून अभिमान वाटतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. काहींनी अदा शर्माकडे मराठी चित्रपटात काम करण्याचीही विनंती केली आहे.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

सुदिप्तो सेन यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यात अदासोबतच सोनिया बलानी, योगिता बहानी आणि सिद्धी इदनानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अदा शर्माने 2008 मध्ये बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. मात्र ‘द केरळ स्टोरी’मुळे ती आता प्रकाशझोतात आली आहे.

चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल ती ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “या चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मी या इंडस्ट्रीतून नाही. त्यामुळे जेव्हाकधी मी एखादी ऑफर स्वीकारायचे, तेव्हा तो माझा शेवटचा चित्रपट असेल असा विचार करायचे. मला स्वत:वरच शंका असायची. कोणी माझ्या कामावर विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मला पडायचा. पण आता खूप चांगलं वाटतंय. इंडस्ट्रीबाहेरून आलेली एक मुलगी असं काही करू शकेल, याचा कोणी विचार केला असेल. मला अशा अनेक कलाकारांचे मेसेज आले की, तुझ्यामुळे आम्हालासुद्धा सकारात्मकता मिळाली आहे.”

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.