The Kerala Story फेम अदा शर्मा जगते रॉयल आयुष्य; भव्य घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन आणि बरंच काही…

'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्रीचं मुंबई याठिकाणी भव्य घर... अभिनेत्रीकडे प्रचंड महागड्या गाड्या... तिच्या संपत्तीचा आकडा हैराण करणारा

The Kerala Story फेम अदा  शर्मा जगते रॉयल आयुष्य; भव्य घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन आणि बरंच काही...
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 3:05 PM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. अनेक ठिकाणी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा विरोध करण्यात आला, तर अनेक ठिकाणी सिनेमाला बॅन देखील करण्यात आलं आहे. पण सिनेमाची चर्चा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अदा हिच्या लोकप्रियतेत देखील प्रचंड वाढ झाली आहे. सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या तिच्या संपत्तीमुळे चर्चेत आहे. अदा प्रचंड रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्रीचा 11 मे रोजी जन्म झाला होता.

अदा हिने ‘1920’ रोजी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अदाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अदा हिने तलुगू, कन्नड आणि तामिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. सध्या अदा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमासाठी अभिनेत्री तब्बल १ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी उन्नीकृष्णन ही एक हिंदू मुलगी आहे. पण ती एका मु्स्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि त्या मुलासोबत निकाह करते. त्यानंतर शालिनी हिचा पती तिला ISIS मध्ये पाठवून देतो.

हे सुद्धा वाचा

the kerala story

अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अदाच्या लोकप्रियतेत आणि नेटवर्थमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अदा शर्मा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे जवळपास १० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे. शिवाय अदा शर्मा मुंबई येथे एका भव्य घरात राहते. तिच्या घराची किंमत देखील कोट्यवधींमध्ये आहे.

गडगंज संपत्तीसोबतच अभिनेत्रीकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अदा शर्मा हिच्या गॅरेजमध्ये ऑडी 6, ऑडी A4C, BMW X5 यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. अभिनेत्री कायम तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय अदाच्या फॅशन सेन्सची देखील सोशल मीडियावर सतत चर्चा रंगलेली असते.

सिनेमात शालिनी उन्नीकृष्णन हिची भूमिका साकारताना घाबरली होती अदा शर्मा

अदा शर्मा सांगते की, ज्या दिवसापासून तिने शालिनीची कथा ऐकली त्या दिवसापासून सिनेमाच्या शूटिंगपर्यंत तिला एवढंच समजलं होतं की शालिनी दहशतवादाच्या जाळ्यात अडकलेली एक निष्पाप मुलगी आहे. ‘शालिनी उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप घाबरले होते. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरु शकत नाही…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लोकांना जागरूक करण्यात हा सिनेमा यशस्वी होत आहे याचा मला आनंद आहे. यातून एखाद्याचा जीवही वाचला, तर सिनेमा बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल. जीवनात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करावा. गरज भासल्यास आपल्या ज्येष्ठांचेही मत घेतलं पाहिजे. असं देखील अभिनेत्री म्हणाली…

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.