The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’चा नवा विक्रम; तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

शाहरुख खानच्या 'पठाण'नंतर सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. यामध्ये अदा शर्मासोबतच सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

The Kerala Story | 'द केरळ स्टोरी'चा नवा विक्रम; तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
The Kerala StoryImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 9:51 AM

मुंबई : सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या सोमवारी या बहुचर्चित चित्रपटाने कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 204.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अदा शर्माची मुख्य भूमिका असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या आठवड्यात 81.14 कोटी रुपये तर दुसऱ्या आठवड्यात 90.58 कोटी रुपये कमावले आहेत. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची दमदार कमाई सुरू आहे. एकीकडे या चित्रपटावरून देशभरात अजूनही वाद सुरू आहे. तर दुसरीकडे थिएटरमध्ये प्रेक्षक गर्दी करत आहेत. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मांतर केलं जातं, त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत कसं सामील केलं जातं याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

द केरळ स्टोरीची तिसऱ्या वीकेंडची कमाई-

तिसरा शुक्रवार- 6.6 कोटी रुपये तिसरा शनिवार- 9.15 कोटी रुपये तिसरा रविवार- 11.50 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. यामध्ये अदा शर्मासोबतच सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘द केरळ स्टोरी’च्या यशाचं कौतुक करताना निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. ‘आपण इतरांशी आणि स्वत:शी खोटं बोलण्यात इतके सहज झालो आहोत की जेव्हा कोणी पुढे जाऊन सत्य दाखवतो, तेव्हा आपल्याला धक्काच बसतो. ‘द केरळ स्टोरी’च्या जबरदस्त यशावर बॉलिवूडचं मृत्यूसारखं मौन सर्वकाही स्पष्ट करतोय’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अभिनेत्री अदा शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘भारतीय प्रेक्षकांना शुभेच्छा. ज्या लोकांनी होर्डिंग्स लावले, पेंटिंग्स केले, व्हिडीओज पोस्ट केले, चित्रपटाचं कौतुक केलं, चित्रपटासाठी विविध राज्यांमध्ये प्रवास केला अशा सर्वांना शुभेच्छा. तुमचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. तुमच्या यशात मला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. परदेशातही ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय’, असं तिने लिहिलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.