ईशा हैराण, थेट या व्यक्तीचे ‘बिग बाॅस 17’मध्ये आगमन, निर्मात्यांची मोठी खेळी
बिग बाॅस 17 धमाका करताना दिसतंय. विशेष म्हणजे बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे हंगामे होणार हे नक्कीच आहे. प्रेक्षकांचे फुल मनोरंजन होणार हे नक्कीच.
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहेत. हे सीजन देखील टीआरपीमध्ये टाॅपला आणण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 मध्ये ईशा ही एक वेगळ्या प्रकारे गेम खेळताना दिसत आहे. इतकेच नाही तर गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान याने तिला खडेबोल सुनावले होते. आता थेट ईशा मालवीय हिच्या करंट बॉयफ्रेंडचे आगमन हे बिग बॉस 17 मध्ये झाले आहे. यामुळे सर्वांनाच मोठा झटका बसलाय.
बिग बॉस 17 कडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये क्रेझही आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे पहिल्याच दिवसापासून बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 चा दुसरा विकेंडचा वार धमाकेदार झालाय. सलमान खान याने सर्वांनाच मोठा धक्का दिलाय. थेट ईशा हिचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल हा बिग बॉस 17 मध्ये दाखल झालाय.
समर्थ जुरेल याने बिग बाॅसच्या घरात वाइल्ड कार्ट एंट्री घेतलीये. इतकेच नाही तर समर्थ जुरेल याच्या आगमनानंतर बिग बाॅसच्या घरात मोठी भांडणे झाली. समर्थ याला ईशाने विचारले की, तू काय म्हणून इथे आला आहेस. त्यावर तो थेट म्हणतो की, मी कोण आहे तुझा? त्यावर ईशा म्हणते की, मित्र…हे ऐकून समर्थ हा संतापताना दिसतोय.
View this post on Instagram
तो थेट म्हणतो की, ही अत्यंत खोटारडी मुलगी आहे. दुसरीकडे अभिषेक हा रडताना दिसतोय. कारण अभिषेक आणि ईशा देखील काही दिवस रिलेशनशिपमध्ये होते. घरातील सर्व सदस्य हे अभिषेक याला सांभाळताना दिसत आहेत. ज्यावेळी ईशाची पोलखोल समर्थ हा करतो, त्यावेळी अभिषेक हा त्याच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे दिसतंय.
अभिषेक आणि समर्थ हे एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे दिसत आहेत. मात्र, आता हे नक्की आहे की, पुढील काही दिवसांमध्ये ईशा हिच्याबद्दल अनेक मोठे खुलासे बिग बाॅसच्या घरात होऊ शकतात. समर्थ याला बिग बाॅसच्या घरात पाहून ईशा हिला जोरदार झटका बसल्याचे तिच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होते. मोठे हंगामे होणार हे नक्की आहे.