Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’च्या निर्मात्यांची मोठी खेळी, घरातील सदस्यांना दिला झटका
बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. पहिल्याच दिवशी बिग बॉस 17 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळालाय. आता नुकताच बिग बॉस 17 ने मोठी खेळी खेळलीये.
मुंबई : बिग बॉस 17 चा प्रिमियर नुकताच पार पडलाय. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतंय. अनेक प्रसिद्ध चेहरे हे बिग बॉस (Bigg Boss) 17 मध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे बिग बॉस 17 च्या घरात पहिल्याच दिवशी या प्रेक्षकांमध्ये वाद होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर घरातील सदस्य हे थेट धक्काबुक्कीवर आले. नुकताच याचा व्हिडीओ (Video) तूफान व्हायरल होताना दिसतोय.
बिग बॉस 16 टीआरपीमध्ये धमाका करताना दिसले. बिग बॉस 17 कडून देखील निर्मात्यांना असाच अपेक्षा आहेत. बिग बॉस 17 च्या घराची थिंम देखील चाहत्यांना आवडलीये. पहिल्याच दिवशी बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिच्या पतीमध्ये वाद बघायला मिळाला. अंकिता पती विकीवर चिडताना दिसली.
बिग बॉस 17 चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. बिग बॉस 17 चा तो व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस मोठा खुलासा करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सर्व घरातील सदस्य एकत्र आल्याचे दिसतंय. यावेळी बिग बाॅस हे घरातील सदस्यांसोबत बोलताना दिसत आहेत.
View this post on Instagram
माझ्यासमोर अंकिता, नील, ऐश्वर्या, रिंकू अशी बरीच मोठी यादी आहे. हे टीव्हीचे मोठे चेहरे आहेत. मला हे नक्कीच माहिती आहे की, घरातील सदस्य हे उशीरा का होईना माझ्यावर आरोप करणार की मी अंकिता लोखंडे हिला सपोर्ट करतोय. विशेष म्हणजे हे आरोप आज किंवा उद्या ऐकायला मिळणारच आहेत.
आता मी डंके की चोट पर बायस्ड आहे, असे थेट बिग बाॅसने म्हटले. माझ्या शोच्या हितासाठी जे काही असेल ते मी उघडपणे करेन आणि जे माझ्या शोसाठी उपयुक्त नाहीत ते माझ्यासाठी व्यर्थ असतील. माझा आता पक्षपाताचा (बायस्ड) खेळ इथून सुरू होतो, बिग बाॅसचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.