सॅम बहादूर रिलीज होताच मोठा झटका, विकी काैशल याच्यासोबत निर्मात्यांचे वाढले टेन्शन
सॅम बहादूर हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सॅम बहादूर चित्रपटात विकी काैशल हा मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळतंय. सॅम बहादूर हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.
मुंबई : सॅम बहादूर हा चित्रपट आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे विकी काैशल याच्या सॅम बहादूर या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. सॅम बहादूर चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. विशेष बाब म्हणजे विकी काैशल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. आता नुकताच विकी काैशल याच्यासह सॅम बहादूर चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा झटका लागणारी बातमी पुढे येतंय. धक्कादायक म्हणजे थेट चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवर याचा परिणाम होऊ शकतो. आज सकाळपासूनच चाहत्यांचा हा चित्रपट बघण्यावर भर दिसतोय.
सॅम बहादूर चित्रपट ऑनलाईन लीक झालाय. यामुळे हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. विशेष म्हणजे सॅम बहादूर चित्रपटाचा एचडी व्हिडीओ व्हायरल झाल्याचे बघायला मिळतंय. हा मोठा झटका असणार आहे. फक्त कुठल्याही एक साईटवर नाही तर चार ते पाच साईटवर या चित्रपटाची एचडी लिंक बघायला मिळत आहे.
खरोखरच हा प्रकार धक्कादायक आहे. आता विकी काैशल हा आपल्या चाहत्यांना याबद्दल काय आवाहन करतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. चित्रपट रिलीज होऊन काही तास झाले असतानाच चित्रपटाची एचडी लिंक व्हायरल झालीये. मुळात म्हणजे एखादा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो लीक होणे हे पहिल्यांदा नक्कीच घडले नाहीये. यापूर्वी अनेक चित्रपटांसोबत असेच झाले.
सॅम बहादूर या चित्रपटाचे विकी काैशल याने जोरदार प्रमोशन केले. मुंबईमध्ये सॅम बहादूर चित्रपटाचे स्पेशल स्क्रीन पार पडले. यावेळी विकी काैशल याचे संपूर्ण कुटुंब त्याला सपोर्ट करण्यासाठी पोहचल्याचे बघायला मिळाले. कतरिना कैफ आणि विकी काैशल याच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला.
सॅम बहादूर या चित्रपटासाठी विकी काैशल याने खूप जास्त मेहनत घेतलीये. विशेष म्हणजे विकी काैशल याचा हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित नक्कीच आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसले. सॅम बहादूर चित्रपट कमाईमध्ये मोठा धमाका करेल असेही सातत्याने सांगितले जातंय. चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा नक्कीच आहेत.