Special Story | नव्या वर्षात मनोरंजनाची मोठी मेजवानी, ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित…
2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अतिशय खडतर ठरले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच चित्रपटगृहेदेखील लॉकडाऊन झाली होती.
मुंबई : 2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अतिशय खडतर ठरले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच चित्रपटगृहेदेखील लॉकडाऊन झाली होती. आता 2021 या नव्या वर्षाची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. हे नवे वर्ष सर्वांसाठी आनंद शकेल असा सर्वांना विश्वास आहे. अनलॉकमध्ये थिएटर सुरू झाल्याने 2021मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2021 या नवीन वर्षात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. नव्या वर्षात बॉलिवूडचे अनेक बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.(The movie ‘Hey’ will be screened in the new year)
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये गणले जातात. दोघांचेही चाहते त्यांचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची वाट गेल्या अनेक दिवसांपासून बघत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2018 पासून सुरू असलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटींच्या घरात गेले आहे.
‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ‘स्टार’ आणि ‘डिज्नी इंडिया’ चे अध्यक्ष उदय शंकर यांनी ‘ब्रह्मास्त्र’ हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट असण्याची शक्यता वर्तविली होती.
83 कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित चित्रपट ‘83’ हा 2020मध्ये प्रदर्शनाच्या मार्गावर होता. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून 1983च्या विश्वचषक सामन्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत. या चित्रपटात रणवीर सोबत दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी आणि अनेक कलाकार दिसणार आहेत.
राधे सलमान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वांटेड भाई’ हा चित्रपट 2020मध्ये ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊ शकले नाही. चर्चित वृत्तानुसार आता हा चित्रपट 2021च्या ईदला प्रदर्शित हणार आहे. या चित्रपटात सलमानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवांनी केले आहे.
बधाई दो अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. हे दोघेही ‘बधाई हो’ चित्रपटाची फ्रेंचायझी ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहेत. ‘बधाई दो’ हा एक विनोदी चित्रपट असून, यातून एक खास कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लालसिंग चड्ढा आमिर खान आणि करिना कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक असणार आहे. ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट डिसेंबर 2021मध्ये प्रदर्शित होईल. करिना कपूरने नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
बॉबी बिस्वास अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘बॉबी बिस्वास’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ या चित्रपटातील एका पात्रावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हटके लूकमध्ये दिसणार आहे.
बच्चन पांडे बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार दरवर्षी 4 ते 5 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतो. त्याच्या याच प्रथेनुसार 2021मध्येही अक्षय अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘बच्चन पांडे’. ‘बच्चन पांडे’मध्ये अभिनेत्री कृती सेनॉन अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
(The movie ‘Hey’ will be screened in the new year)