Kushi | कुशी चित्रपटाने केले तब्बल इतक्या कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन, या दिवशी करणार विजय देवरकोंडाचा चित्रपट ओटीटीवर धमाका
विजय देवरकोंडा याचा कुशी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान असा चर्चेत होता. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. विजय देवरकोंडा चित्रपट धमाका करताना बाॅक्स आॅफिसवर दिसतोय. विजय देवरकोंडा याचा हा बहुचर्चित चित्रपट आहे.
मुंबई : विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा कुशी हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. कुशी चित्रपटाची शूटिंग ही तब्बल तीन वर्षे सुरू होती. कुशी (Kushi) चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केलंय. मुळात म्हणजे सध्या कुशी चित्रपटाचा जलवा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय. रविवारी चित्रपटाचे तूफान असे बाॅक्स आॅफिस कलेक्शन होऊ शकते. विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांची जोडीही प्रेक्षकांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय.
सामंथा रुथ प्रभू हिला हिच्या आजारामुळे काही दिवस चित्रपटाचे शूटिंग बंद होते. मात्र, त्यानंतर सामंथा रुथ प्रभू हिने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. सामंथा रुथ प्रभू ही विजय देवरकोंडा याच्यासोबत कुशी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट नुकताच 1 सप्टेंबर रोजी रिलीज झालाय. चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका केल्याचे बघायला मिळाले.
A complete family entertainer ❤️
Back with a blockbuster #Kushi #VijayDeverakonda #BlockbusterKushi #Samantha #Kushireview pic.twitter.com/NU8zBTAGoT
— CH3RRY. (@CH3RRY20x4) September 1, 2023
कुशी चित्रपट थिएटरनंतर थेट ओटीटीवर देखील धमाका करताना दिसणार आहे. Amazon Prime वर तुम्ही कुशी हा चित्रपट बघू शकता. ऑक्टोबर 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये कुशी हा चित्रपट ओटीटीवर धमाका करताना दिसणार आहे. म्हणजेच काय तर थिएटरनंतर ओटीटीवर विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा चित्रपट आपली हवा करणार आहे.
कुशी चित्रपटामध्ये विजय देवराकोंडा, सामंथा रुथ प्रभू, वेनेला किशोर, रोहिणी, सरन्या प्रदीप, श्रीकांत अय्यंगार, अली, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, लक्ष्मी, जयराम राहुल रामकृष्ण हे देखील धमाका करताना दिसत आहेत. ओपनिंग डेला कुशी चित्रपटाने जबरदस्त कामगिरी करत थेट 15.25 कोटींचे कलेक्शन बाॅक्स आॅफिसवर केले आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 9.90 कोटींचे कमाई केली.
Just Now Completed My show 🤩
What A Comeback From Rowdy Boy 🥵💥💥💥 First Half Is Good 👍👍 Second Half Excellent 💥💥 Sam and Vijay Chemistry 🤯👌👌 Interval and Pre Climax 🛐 Block Buster Confirm 💥💥 My Rating – 3.5/5 #Kushi #VijayDeverakonda #Samantha #KushiReview pic.twitter.com/4qQm07AyFa
— killbill (@Nithin_kumarrr) September 1, 2023
रिपोर्टनुसार कुशी या चित्रपटाचे बजेट मोठे असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ज्याप्रमाणे कमाई केलीले, त्यानुसार चित्रपट पुढील काही दिवस मोठा धमाका करणार हे नक्कीच आहे. विशेष म्हणजे विजय देवराकोंडा याचा हा चित्रपट सुपरहिट ठरू शकतो. विजय देवराकोंडा, सामंथा रुथ प्रभू यांचा हा चित्रपट तमिलमध्ये तयार करण्यात आलाय.